रेल्वे तिकिट ‘रद्द’ करताना लक्षात ठेवा ‘हे’ 8 नियम, नक्की मिळेल ‘रिफंड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रेल्वेतून रोज कोट्यावधी प्रवासी प्रवास करत असतात, त्यात बऱ्याचदा समस्या येते ती ट्रेन तिकिट बुकिंगची आणि तिकिट रद्द केल्यास त्यातून मिळणाऱ्या रिफंड किंवा परताव्याची, परंतू आता तुमचे हेच पैसे वाया जाणार नाही, कारण रेल्वेने रिफंडसाठी प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना त्याचे तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत. यासाठी काही अटी तर आहेच परंतू पैसे कसे परत मिळवायचे हे माहित असल्यास तुम्हाला तुमचा रिफंड नक्की परत मिळवता येईल. त्यासाठी ८ नियम आहेत जे आपल्याला माहिती हवेत.

१. कन्फर्म तिकिटाला डिपार्चरच्या ४ तास आधी रद्द करा –

कन्फर्म तिकिटवर डिपार्चरच्या ४ तास आधी तिकिट रद्द न केल्यास तुम्हाला रेल्वे कोणताही रिफंड परत करणार नाही. यासाठी डिपार्चरच्या ४ तास आधी तिकिट रद्द करा. 
२. तात्काळ रेल्वे तिकिट रद्द केल्यास रिफंड नाही –
तात्काळ रेल्वे तिकिटला केवळ एक दिवस आधी बुक केले जाऊ शकते. परंतू हे तिकिट तुम्ही रद्द केले तर तुम्हाला कोणताही रिफंड मिळणार नाही. परंतू जर तुमचे तिकिट वेटिंगला असेल तर तुम्हाला रेल्वे तिकिट रद्द केल्यास रिफंट देईल.
३. प्रिमियम स्पेशल रेल्वेची तिकिट होणार नाही रद्द-
IRCTC च्या नियमांनुसार कोणत्याही प्रकारच्या प्रीमियम स्पेशल रेल्वेसाठी कन्फर्म किंवा RAC तिकिट रद्द होणार नाही. या रेल्वेचे तिकिट तेव्हाच रद्द होईल जेव्हा रेल्वे रद्द होईल आणि तेव्हाच तुम्हाला देखील रिफंड मिळेल. 
४. रेल्वेला उशीर झाल्यास त्याचा तिकिट रिफंड नाही –
जर रेल्वे निश्चित वेळेपेक्षा ३ तास उशीरा आहे आणि त्याचा डिपार्चर टाइम होऊन गेला असेल तरी देखील तुम्हाला तिकिट रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही. 
५. रेल्वे रद्द झाल्यास रिफंड मिळणार –
जर रेल्वे रद्द करण्यात आली तर तुम्हाला रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे तिकिट रद्द करुन रिफंड देण्यात येईल. तुम्ही हा रिफंड रेल्वे डिपार्चर टाइमच्या तीन दिवसच्या आता मिळवू शकतात. 
६. आय तिकिट हरवल्यास तिकिट रद्द करता येणार नाही –
जर तुमचे आय तिकिट हरवले तर तुम्हाला तिकिट रद्द करता येणार नाही. अशात तुम्हाला कोणताही रिफंड मिळणार नाही, परंतू तुम्ही तिकिट हरवले तरी रेल्वे तुम्हाला डुप्लीकेट आय तिकिट देईल त्याद्वारे तुम्ही प्रवास करु शकता. 
७. आय तिकिट डिपार्चरच्या अर्ध्यातास आधी रद्द करा –
आय तिकिट रद्द करायचे असल्यास तुम्ही ३० मिनिट आधी रद्द करु शकता. परंतू तुम्ही ३० मिनिटानंतर तिकिट रद्द केल्यास तुम्हाला रिफंड मिळणार नाही. 
८. एकापेक्षा आधिक तिकिट बुकिंगवर हा आहे नियम –
तुम्ही जर अनेक तिकिट बुक केली असतील आणि ती कन्फर्म झाली असतील आणि काही तिकिट मात्र अनकन्फर्म असतील तर तुम्ही रेल्वेच्या डिपार्चर टाइमच्या ३० मिनिट आधी तिकिट रद्द करु शकता. तुम्हाला त्याचा रिफंड देखील मिळेल. परंतू त्यानंतर तुम्ही तिकिट रद्द करु इच्छित असाल तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही. हे नियम RAC आणि वेटिंग तिकिटाला देखील लागू असतील.

आरोग्यविषयक वृत्त