IRS Sachin Sawant Arrested by ED | वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना अटक, भ्रष्टाचार प्रकरणी ED कडून कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IRS Sachin Sawant Arrested by ED | ज्येष्ठ आयआरएस अधिकारी आणि ईडीचे माजी कर्मचारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीने छापेमारी (ED Raids) केली आहे. यानंतर ईडीने सचिन सावंत यांना अटक केली. ईडीकडून आजपर्यंत राजकीय नेते, मोठे अधिकारी यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली जात होती. मात्र, आता ईडीचे माजी कर्मचारी ईडीच्या रडावर (IRS Sachin Sawant Arrested by ED) आल्याचे दिसून येत आहे.

सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात (Indirect Taxes & Customs Department) कार्यरत असलेले सचिन सावंत यांच्या मुंबईतील घारावर ईडीने मंगळवारी छापेमारे केली होती. भ्रष्टाचार (Corruption) आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ही करावाई करण्यात आली. काल मध्यरात्रीपर्यंत सचिन सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरु होता. 500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यावरुन सीबीआयने (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली. आणि याच प्रकरणात काल ईडीने छापेमारी केली होती. (IRS Sachin Sawant Arrested by ED)

काय आहे प्रकरण?

वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यापूर्वी ईडी मुंबई झोन-2 (ED Mumbai Zone-2) मध्ये उपसंचालक (Deputy Director) म्हणून कार्यरत होते. काही हिरे कंपन्यांद्वारे 500 कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवल्या प्रकरणी ईडीमध्ये असताना त्यांची चौकशी झाली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने सचिन सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावरुन सीबीआयने सचिन सावंत यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पद आहे.

Web Title :  IRS Sachin Sawant Arrested by ED | central agency ed raids on senior irs officer and former ed employee sachin sawant in corruption case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whimsical AI Artistry: Disney-Style Cartoon Portrayals of Maharashtra’s Political Leaders

Why You Need Your Own Health Insurance Even With Employee Coverage

Maharashtra Cabinet Decision | वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला सावरकरांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Actress Sonnalli Seygall | अभिनेत्री सोनाली सेहगल मालदीवमध्ये एन्जॉय करतीये हनीमून; फोटो केले पोस्ट