‘ही’ अभिनेत्री साकारणार आता नवीन शनाया

 मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

छोट्या पडद्यावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’  या मालिकेला रसिकांनी अक्षरश : डोक्यावर घेतलं आहे. गेले वर्षभर रसिकांची आवडती मालिका म्हणून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे . या मालिकेतील राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांची पात्रे विशेष लोकप्रिय ठरली आहेत.आपल्या विशेष अंदाजात रसिका सुनील हिने निगेटिव्ह भूमिकेतली शनाया साकारली आहे. ऐन टप्प्यात  असताना रसिक सुनीलने हि मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशात फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी रसिकाने ही मालिका सोडली आहे. रसिकाने गेल्या वर्षी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता, यंदा तिला प्रवेश मिळाला.

बिग बॉसच्या १२’ व्या सिझनमध्ये ही  मराठमोळी अभिनेत्री झळकणार

तिच्या जागी शनायाची भूमिका कोण करणार,ह्या विषयावर चर्चा रंगली होती  ; पण आता हा  हा शोध संपला आहे. ‘जय मल्हार’ मालिकेत बानूची व्यक्तिरेखा करणारी इशा केसकर शनायाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अन् १६० नवऱ्यांनी घातले चक्क ‘जिवंत’ पत्नींच्या नावाने श्राद्ध!

येत्या २  सप्टेंबरला डॅशिंग नवीन शनायाचे दर्शन मालिकेत घडणार आहे. या खास भागाचे २९ ऑगस्टलाच चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती मिळते आहे. इशा आता शनायाची व्यक्तिरेखा कशी साकारणार आणि प्रेक्षकांचा तिला कसा प्रतिसाद लाभतो, हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे.

[amazon_link asins=’B07D7YV9FW,B0794Y5RHR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’546fd8c6-add7-11e8-975e-2dfb68b0092c’]