इस्त्रायलच्या लोकांनी केला ‘ऊँ नमः शिवाय’चा जप, भारतासाठी केलेल्या प्रार्थनेचा Video वायरल; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असून मागील काही दिवसांपासून दररोज 3-4 लाख केस समोर येत आहेत. देशाची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे आणि प्रत्येकजण आपआपल्या स्तरावर कठिण काळाला तोंड देत आहे. अनेक देशांनी यासाठी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, इस्त्रायलमध्ये एक व्हिडिओ खुप वायरल होत आहे, ज्यामध्ये या देशातील शेकडो लोक एकत्र येऊन ऊँ नम: शिवायचा जप करून भारतासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. इस्त्रायलने जगात सर्वाधिक लसीकरण करून कोरोनाला आपल्या देशातून हद्दपार केले आहे.

हा व्हिडिओ पवन के. पाल यांनी आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर शेयर केला आहे. ते इस्त्रायलमध्ये भारतीय डिप्लोमॅट आहेत आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस 2017 चे पासआऊट आहेत. पवन यांनी या व्हिडिओच्या कॅपशनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा तुमच्यासाठी संपूर्ण इस्त्रायल एकत्र येऊन आशेच एक किरण बनतो.

इस्त्रायल आणि भारतातील लोकांचे एक आध्यात्मिक कनेक्शन सुद्धा आहे. इस्त्रायलचे अनेक तरूण दरवर्षी भारतात येतात आणि हिमाचल प्रदेशात कसौल, कालगा, मलाना सारख्या ठिकाणी थांबतात. इस्त्रायलमध्ये तीन वर्षाच्या मिलिट्री ट्रेनिंगनंतर आराम करण्यासाठी हे लोक भारतातील पर्वतीय भागात येतात.

इस्त्रायलने काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाला कोरोनामुक्त देश घोषित केले होते. इस्त्रायलने आपल्या सामुहिक लसीकरण अभियानानंतर कोरोना व्हायरस प्रतिबंधात शिथिलता आणली आहे आणि शाळा पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. याच कारणामुळे या व्हिडिओमध्ये सुद्धा बहुतांश लोक विना मास्क दिसत आहेत.