10 वी पास उमेदवारांना ‘ISRO’ मध्ये नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 69000 रुपयांपर्यंत पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली. या अंतर्गंत कारपेंटर, केमिकल, इलेक्ट्रिशयन या पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छिक उमेदवारांना isro.gov.in या आधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. या पदांसाठी 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड लेखी परिक्षा आणि मुलाखत या आधारे करण्यात येईल. परंतू अजूनही परिक्षेची तारीख मात्र घोषित झाली नाही.

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी विशेष म्हणजे 10 वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 5 वर्षांचा अनुभव असण्याची शक्यता आहे.

वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर किमान 18 वर्षापेक्षा कमी नसावे.

पद संख्या
एकूण पद – 90
1) कारपेंटर – 1
2) केमिकल – 10
3) इलेक्ट्रीशियन – 10
4) इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक – 14
5) फिटर – 34
6) इंस्‍टूमेंट मॅकेनिक – 2
7) पंप ऑपरेटर सह मॅकेनिक – 6
8) एयर कंडीशनिंग – 5
9) फिटर- 2
10) बॉयलर अटेंडेंट – 2
11) इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक- 1
12) यांत्रिक – 2

येथे होईल नियुक्ती
निवड झालेल्या उमेदवारांना प्रोपेलेंट कॉम्प्लेक्स, रासयानी सुविधा, रायगड, महाराष्ट्र आणि ISTRAC ग्राउंड स्टेशन, SDSC बिहार, श्रीहरिकोटा येथे नियुक्त करण्यात येईल.

हा असेल पगार
निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 रुपये ते 69,100 रुपयांच्या दरम्यान असेल.

Visit : Policenama.com