IT-BPM | चालू आर्थिक वर्षात आयटी-बीपीएम उद्योग देईल 3.75 लाख नवीन नोकर्‍या

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन  – IT-BPM | माहित तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन (information technology and business process management) क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात 3.75 लाख नवीन नोकर्‍या (New Jobs) मिळण्यासह या उद्योगात काम करणार्‍या लोकांची संख्या 48.5 लाखापर्यंत पोहचू शकते. (IT-BPM)

टीमलीज सर्व्हिसेसच्या विशेष कर्मचारी प्राभागच्या टीमलीज डिजिटल एम्प्लॉयमेंट आऊटलुक रिपोर्टनुसार, मार्च 2022 पर्यंत आयटी-बीपीएम (IT-BPM) मध्ये कर्मचार्‍यांची संख्या 44.7 लाखावरून वाढून 48.5 लाख होईल. रिपोर्ट सांगतो की, आयटी-बीपीएम क्षेत्रात गुंतवणूक वाढणे आणि देशात उद्योजकांद्वारे तंत्रज्ञान वेगाने अवलंबण्यासह हा उद्योग भरतीच्या बाबतीत सकारात्मक मार्गावर आहे.

हा रिपोर्ट 100 पेक्षा जास्त कंपन्या आणि प्रमुख अधिकार्‍यांच्या सर्वेक्षणातून आणि मुलाखतीच्या आधारावर तयार केला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, एकुणच भरतीबाबत स्थिती सकारात्मक आहे, शिवाय कर्मचारी-कंपनी कराराचे मॉडल सुद्धा प्रभावित करत आहे.

रिपोर्टनुसार, या उद्योगात जिथे पूर्णकालीन रोजगारात प्रामुख्याने वाढ होत आहे तर 17 टक्के वाढीसह कंत्राटी कामगारांना सुद्धा बाजारातील सकारात्मकेतेचा फायदा होईल.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मार्च 2022 पर्यंत आयटी क्षेत्रात कंत्राटी कर्मचार्‍यांची संख्या 1.48 लाखापर्यंत पोहचण्याची आशा आहे.

Web Title  : IT-BPM | it bpm industry will create 375 lakh new jobs in the current financial year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा