Jack Flint | लग्नानंतर काही तासांतच ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला जगाचा निरोप

पोलीसनामा ऑनलाइन : Jack Flint | देशातील प्रसिद्ध गायक जेक फ्लिंटचे निधन झाले आहे. मनोरंजनसृष्टीतून एकामागोमाग एक धक्के प्रेक्षकांना मिळत आहेत. जेकच्या लग्नानंतर काही तासांतच त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच त्याचे चाहते, कुटुंब, मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. जेकच्या जाण्याने हॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून शोककळा व्यक्त केली जात आहे. (Jack Flint)

नुकतेच 26 नोव्हेंबर रोजी जेकने लग्न केले होते आणि काही तासांतच त्याने झोपेत जगाचा निरोप घेतला. अद्याप तरी त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही. जेकच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने फेसबुकवर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “आता आम्ही दोघे आमच्या लग्नाचे फोटो पाहिले पाहिजे होते. परंतु तसे नाही तर या क्षणी मला माझ्या पतीचे कोणते कपडे पुरायचे याचा विचार करावा लागत आहे. याचा मला खूप त्रास होत आहे. सध्या माझे हृदय तुटले आणि मला त्याची खूप गरज आहे. मला हे सहन होत नाही मला तो परत हवा आहे, अशा शब्दांत जेकच्या पत्नीने पोस्ट शेअर केली आहे. सध्या ती मोठ्या दुःखात असल्याचे दिसत आहे. (Jack Flint)

जेकच्या मॅनेजरने सोशल मीडियावर पोस्ट करत जेकच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली आहे.
त्या म्हणाल्या, जेक माझ्या मुलासारखा होता. त्याचे जाणे ही मोठी शोकांतिका आहे आणि आमच्यासाठी
मोठा धक्कादेखील आहे. जेकच्या जाण्यामुळे त्याचे चाहतेही दुःखी असल्याचे दिसत आहे.
2016 मध्ये जेकने गायनात पदार्पण केले होते. ‘आय एम नॉट ओके’ हा त्याचा पहिला अल्बम ज्याने प्रेक्षकांना
वेड लावले होते, तर त्याचा दुसरा अल्बम 2020 मध्ये आला या अल्बमला त्यांनी स्वतःचेच नाव दिले होते.
आजपर्यंत जेकने फायरलाइन, व्हॉट्स युवर नेम, अशी बरीच प्रसिद्ध गाणी गायली आहेत.
जेक कायमच त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असायचा. आता त्याच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.

Web Title :- Jack Flint | a famous singer jake flint died within a few hours after the wedding

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले

Footballer Pele | ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले रुग्णालयात

Raj Thackeray | राष्ट्रवादीने राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले, राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी – राज ठाकरे