अभिनेता जॅकी चॅन झाला ‘कोरोना’चा शिकार ? गिफ्ट म्हणून मिळत आहेत ‘फेस मास्क’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनानं चीनसहित इतरही अनेक देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. या आजारमुळं जगभरातील 2800 लोकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की, हाँगकाँगचा ॲक्टर जॅकी चॅन हेदेखील या व्हायरसचा शिकार झाला आहे. जॅकी चॅननं या रिपोर्टचं सोशल मीडिायावर खंडन केलं आहे.

जॅकी चॅननं इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना जॅकीनं लिहिलं आहे की, या आठवड्यात माझ्या स्टाफनं मला सांगितलं की, जगभरातील मीडियात अशी बातमी पसरत आहे की, मला कोरोना व्हायरस झाला आहे. परंतु मी पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहे.” असं त्यानं सांगितलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये जॅकी चॅन पुढे म्हणतो, “मला माझ्या अनेक मित्रांनी मेसेज करून विचारलं की मी सुरक्षित तर आहे ना. मी सर्वांचे आभार मानतो. तुमचं प्रेम, चिंता मनाला स्पर्श करणारी आहे. खूप खूप धन्यवाद.”

लोकांनी पाठवले मास्क
जॅकी चॅननं एका मुलाखतीत सांगितलं की, जगभरातील लोक त्याला स्पेशल गिफ्ट पाठवत आहेत. जॅकीनं सांगितल्यानुसार, या गिफ्टमध्ये अनेक फेस मास्कही आहेत. मी माझ्या स्टाफला सांगितलं की, हे गिफ्ट अशा एखाद्या संस्थेला द्या जे गरजूंना देतील असंही जॅकीनं सांगितलं.