पुरी येथील जगन्‍नाथ मंदिराबाबतच्या ‘या’ ७ गोष्टी ऐकून व्हाल थक्‍क, हवेच्या विरूध्द दिशेला फडकतो ‘ध्वज’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओरिसातील तीर्थक्षेत्र जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला सुरुवात होणार असून या यात्रेचा उत्सव १० दिवस साजरा केला होता. या रथयात्रेसाठीही देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दाखल होत असतात. या रथयात्रेवेळी फक्त भगवान जगन्नाथ यांच्याच रथाचा नाही तर तिन्ही भावा बहिणींच्या रथांचा रंग वेगवेगळा असतो. त्याचबरोबर या तीनही रथांचे नाव देखील वेगवेगळे असते.

भगवान जगन्नाथ यांच्या रथाला ‘गरुडध्वज’ किंवा ‘कपिलध्वज’ म्हटले जाते. तीनही रथांमध्ये हा रथ सर्वात मोठा असतो. या रथाला एकूण १६ चाके लावण्यात येतात. या रथाची उंची हि १३.५ मीटर असते त्याचबरोबर या रथाच्या सजावटीला लाल आणि पिवळ्या रंगाच्या कापडाचा वापर करण्यात येतो. या रथाचे रक्षण हा गरुड करत असतो असे सांगण्यात येत आहे. या रथावर लावण्यात आलेल्या झेंड्याला ‘त्रैलोक्यमोहिनी’ असे म्हणतात.

त्याचबरोबर या मंदिराबाबतच्या या सात गोष्टी तुम्हाला हैराण करू शकतात.

१) या मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही दर्शन घेतल्यास मंदिरावर असणारे सुदर्शन चक्र तुम्हाला तुमच्या समोर असल्यासारखेच दिसेल.

२) मंदिरावर लावण्यात आलेला झेंडा नेहमी हवेच्या उलट्या दिशेला फडकत असतो.

३) या मंदिराचे भोजनगृह हे जगातील सर्वात मोठे भोजनगृह आहे.

४) दररोज संध्याकाळी या मंदिरावरील झेंडा बदलणारा माणूस उलटा चढून तो झेंडा बदलत असतो.

५) मंदिरात पाऊल ठेवल्यानंतर तुम्हाला मंदिरात समुद्राचा अजिबात आवाज येणार नाही. जसे तुम्ही मंदिराच्या बाहेर येता तुम्हाला ते आवाज पुन्हा ऐकण्यास मिळतील.

६) या मंदिरातील भोजनगृहात भगवान जगन्नाथ यांच्यासाठी महाप्रसाद बनवण्यासाठी ५०० आचारी आणि त्यांचे ३०० मदतनीस एकत्र काम करत असतात. येथील सर्व प्रसाद हा मातीच्या भांड्यांमध्ये बनवला जातो.

७) सर्वात जास्त हैराण करणारी गोष्ट म्हणजे या मंदिरावरून आजपर्यंत कोणतेही विमान किंवा पक्षी उडताना पाहण्यात आलेले नाही.

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय