लसीचे दोन्ही डोस घेऊनही प्रसिद्ध महंताचे कोरोनाने निधन, मुख्यमंत्री चौहान यांनी व्यक्त केला शोक

जबलपूर: पोलीसनामा ऑनलाइन – लसीचे दोन्ही डोस घेऊनही मध्यप्रदेशातील नर्मदा कुंभाची स्थापना करणारे जगतगुरूदेव डॉ. श्याम देवाचार्य महाराज यांचे शुक्रवारी (दि. 16) कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संत समाजात शोककळा पसरली आहे. देवाचार्य महाराजांच्या निधनानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.

देवाचार्य महाराजांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेऊन देखील त्यांचे कोरोनाने निधन झाले आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर ते हरिद्वार येथील कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. कुंभमेळ्यातील गर्दीमुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर आजार बळावला, त्यांना तातडीने उपचार न मिळाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.