‘मनसे’च्या रस्ते आस्थापना विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी जगदीश वाल्हेकर 

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाच्या जिल्हाध्यक्ष तथा संघटकपदी जगदीश मारुती वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. रस्ते आस्थापना विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश परुळेकर यांनी वाल्हेकर यांच्या निवडीचे पत्र दिले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2335ef2-d14e-11e8-a969-73136eb8ce4b’]

यावेळी उपाध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस योगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते. रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना चांगल्या प्रतीच्या होण्यासाठी मनसेचा हा विभाग सक्रियपणे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिल्हास्तरीय नेमणूक केल्या आहेत.

कोथळे खून प्रकरण : कामटेसह संशयितांवर दहा आरोप प्रस्तावित : अ‍ॅड. उज्ज्वल निकम 

[amazon_link asins=’B079JVMW7N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03d48111-d14f-11e8-a943-f3be62013888′]

खड्डे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रशासनाला जाब विचारून असुविधांची कोंडी फोडण्यासाठी हा विभाग उपयुक्त ठरेल, असे मत परुळेकर यांनी व्यक्त केले. तर पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करून दबावगट तयार केला जाईल व सदरचा अहवाल सादर करून कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास जगदीश वाल्हेकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा उपसंघटकपदी अनिल वरघडे व गणेश शेळके यांची, जुन्नर तालुका संघटकपदी दत्तात्रय खंडागळे यांची तर मावळ तालुका संघटकपदी संदीप पोटफोडे यांची निवड करण्यात आली आहे.

जाहिरात