Jailer Box Office Collection | जेलर चित्रपटाची पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची कमाई; अनेक शहरांमध्ये केला विक्रम

पोलीसनामा ऑनलाइन – Jailer Box Office Collection | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. रजनीकांत यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जेलर’ चित्रपट (Jailor Movie) बॉक्स ऑफिसमध्ये धुमाकूळ घालत आहे. थलायवा यांचा चाहता वर्ग मोठा असून लाखो प्रेक्षक ‘जेलर’ चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये जात आहे. अभिनेते रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे शो हे हाऊसफुल असून प्रेक्षकांचा उदंड़ प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनंतर त्यांना मोठ्या पडद्यावर एक्शन सीन करता येणार आहेत. अभिनेते रजनीकांत यांच्या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत कोट्यवधी रुपयांची (Jailer Box Office Collection) कमाई केली आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये रजनीकांत यांची क्रेझ जबरदस्त असून त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतात. त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. बहुचर्चित ‘जेलर’ चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी खूप चर्चा रंगली होती. संपूर्ण चेन्नई शहर (Chennai City) चित्रपटाच्या पोस्टरने व रजनीकांत यांच्या फोटोंनी भरून गेले होते. आता चित्रपट प्रदर्शित झाला असून या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 48 कोटींची कमाई केली (Jailer First Day Collection) आहे. पहिल्या दिवशी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी आणि मोफत तिकिटे देखील दिली होती. सर्वत्र फक्त ‘जेलर’ चित्रपटाचीच क्रेझ पाहायला मिळाली. रजनीकांत यांना अनेक वर्षांनी फायटिंग सीन करताना पाहून त्यांच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये जल्लोष केला. ‘जेलर’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 27 कोटींची कमाई केली (Jailer Second Day Collection) आहे. चित्रपटाची घौडदौड सुरु असून बक्कळ कमाई करत आहे.

बहुचर्चित ‘जेलर’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई (Jailer Records) केली आहे.
चित्रपटाने कर्नाटकामध्ये (Karnataka) जबरदस्त ओपनिंग केली आहे.
‘जेलर’ हा सिनेमा तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.
पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केरळ (Kerala) मध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) देखील 2023 सालातील सर्वात जास्त ओपनिंग करणारा सिनेमा ‘जेलर’ ठरला आहे. विक्रमी कमाई करणारा हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालतो आहे. एक जपानी कपल ओसारावरुन चेन्नईमध्ये खास ‘जेलर’ सिनेमा पाहायला आले होते. 200 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेला ‘जेलर’ चित्रपट कलेक्शनच्या (Jailer Box Office Collection) बाबतही आणखी विक्रम करेल अशी चिन्हे सध्या दिसून येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Debit Card | डेबिट कार्डधारक असाल तर तुम्हांला बॅंकेचे ‘हे’ नियम माहिती असणे गरजेचे