SBI Debit Card | डेबिट कार्डधारक असाल तर तुम्हांला बॅंकेचे ‘हे’ नियम माहिती असणे गरजेचे

पोलीसनामा ऑनलाइन – SBI Debit Card | बॅंकेचे व्यवहार हे अतिशय चोख आणि नियमांमध्ये बसणारे असतात. बॅंकेच्या नियमांचे काटेकोर पालन हे आपल्याला करावेच लागते. आता बॅंकेकडून डेबिट कार्डच्या (Debit Card) बाबतीत काही नियम समोर आले आहेत. व्यवहारांमध्ये डेबिट कार्ड हे अत्यावश्यक आणि महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे जर तुम्ही डेबिट कार्ड (SBI Debit Card) धारक असाल तर तुम्हांला बॅंकेचे हे नियम माहिती असणे गरजेचे आहे.

प्रत्येक बॅंक खाते धारकाकडे आता डेबिट कार्ड असलेले पाहायला मिळते. प्रत्येक बॅंकेच्या कोणत्याही डेबिट कार्डवर त्याचा कालावधी लिहिलेला असतो. हा कालावधी 10 वर्षांपर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त असू शकतो. डेबिट कार्ड हे कोणत्याही एटीएम मशीनमध्ये चालत असले तरी त्यासाठी काही वर्षांची मुदत आहे. ही मुदत संपल्यानंतर कार्ड वापरता येत नाही. बॅंकेकडून पुन्हा नवीन डेबिट कार्ड दिले जाते. एका वापरकर्त्यांना सोशल मीडियावर बॅंकेचे नवीन डेबिट कार्ड त्याची मुदत (Debit Card Deadline) संपली तरी आली नसून ते कार्ड आले नाही याबद्दल पोस्ट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा बॅंक डेबिट कार्डचा मुद्दा चर्चेत आला आहे.

भारतीय स्‍टेट बॅंकेच्या (State Bank of India) एका खातेधारकाने तो 10 वर्षे खातेधारक असून त्याचे डेबिट कार्ड एक्सपायर झाले असूनही बॅंकेने त्यांना नवीन कार्ड दिले असून नवीन एप्लीकेशन (New AApplication) करायला सांगितले आहे. एसबीआयच्या या खातेदाराला बॅंकेने उत्तर दिले असून त्याच्या शंकेचे निरासण केले आहे. यामध्ये बॅंकेकडून डेबिट कार्ड मिळाल्यानंतर ते वापरण्याचे काही नियम असतात तसेच ते एक्सपायर झाल्यानंतर बॅंक काही अटींची पूर्तता केल्यानंतरच नवीन कार्ड सुपूर्द करते. या नियमांचे पालन केले तरच नवीन कार्ड हे मिळते, त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा हे नियम माहिती असणे गरजेचे आहे.

बॅंकेकडून दिल्या जाणाऱ्या डेबिट कार्ड (Debit Card) सुविधेसाठी सुरुवातीला एक फॉर्म भरुन एप्लिकेशन करावे लागते.
मात्र जर कार्ड एक्सपायर झाले तर पुन्हा एकदा एप्लिकेशन करण्याची गरज नसते.
ते एक्सपायर होण्यापूर्वी बॅंक तीन महिने आधी रजिस्टर घरच्या पत्त्यावर नवीन कार्ड पाठवून देते.
मात्र ते मिळाल्यामुळे धारकाचा देखील संभ्रम निर्माण झाला होता. त्यासाठी त्याने नियमांचे पालन केले होते.
नवीन कार्ड मिळवण्यासाठी मागील 12 महिन्यांमध्ये म्हणजे वर्षांतून एकदा तरी डेबिट कार्ड वापरले गेले असणे
बंधनकारक आहे. त्याचा वापर होत असेल तरच बॅंक नवीन कार्ड देते.
जर तुमच्या खात्यामध्ये व्यवहार दिसत नसतील आणि खात्यामध्ये फाइनेंशियल इंक्लूजन नसेल तरी देखील तुम्हांला
बॅंक नवीन कार्ड नाकारू शकते. बॅंकेचे खाते हे पॅन कार्ड सोबत लिंक असणे देखील बंधनकारक आहे.
अकाऊंट लिंक नसल्यास बॅंक नवीन कार्ड देत नाही. हे सर्व नियम पूर्ण करत असलेल्या खातेधारकांना डेबिट कार्ड दिले जाते.
आणि कोणी करत नसेल तर त्यांना बॅंकेमध्ये जाऊन पुन्हा एकदा अप्लाय करावे लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Neem Health Benefits | ‘या’ झाडाची पानेच नव्हे, साल आणि बियासुद्धा चमत्कारी, 5 आजार करतात दूर, शरीर होते निरोगी

Ajit Pawar | मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर?, अजित पवार म्हणाले- ‘मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात…’ (व्हिडीओ)