Jailer Movie | सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटासाठी कंपन्यांनी जाहीर केली ऑफिशियल सुट्टी

पोलीसनामा ऑनलाइन – दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा अर्थात अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचे चित्रपट दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या प्रेक्षकांना एक पर्वणीच असते. रजनीकांत यांचा आगामी ‘जेलर’ चित्रपट (Jailor Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर (Jailer Movie Trailer) काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. यावरुन चित्रपटातील रजनीकांत यांचा हटके लूक (Rajinikanth Look In Jailer), फायटिंग आणि ॲक्शन पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटातील ‘कावाला’ हे गाणे देखील लोकांनी डोक्यावर घेतले आहे. अनेक वर्षानंतर रजनीकांत हे मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे या चित्रपटाची आतुरता सर्वांना लागली आहे. दरम्यान, काही राज्य़ांमध्ये ‘जेलर’ चित्रपटाच्या (Jailer Movie) प्रदर्शानाच्या दिवशी ऑफिशियल सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अभिनेते रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटामध्ये ते प्रामाणिक जेलर ची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यांच्या जेलमध्ये कुख्यात गुंड शिक्षा भोगत असून त्याला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहे. यामध्ये रजनीकांत हे ‘मुथुवेल’ हे पात्र साकारणार असून ते जेलरच्या भूमिकेत दिसणार आहेत. गुंडांचे हे प्रयत्न मुथुवेल अर्थात रजनीकांत उडवून लावणार आहेत. यामध्ये रजनीकांत यांची दुसरी भयंकर असून ती इतरांना माहिती नाहीये. ‘जेलर’ या चित्रपटामध्ये हायटेक ड्रामा आणि जबरदस्त फायटिंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सर्वांना या चित्रपटाची जबरदस्त आतुरता लागली असून काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी (Employees Official Holiday For Jailer Movie) जाहीर केली आहे. जेलर चित्रपट येत्या 10 ऑगस्टला रिलीज (Jailer Movie Release Date) होणार असून यादिवशी चेन्नई (Chennai) आणि बेंगलोर (Bangalore) मधील बऱ्याच कंपन्यांनी ऑफिशियल सुट्टी जाहीर केली आहे. तर काही कंपन्यांनी चित्रपटाची मोफत तिकीटे (Jailer Movie Free Tickets) देखील कर्मचाऱ्यांना दिली आहेत.

अभिनेते रजनीकांत हे अनेक वर्षांनंतर ॲक्शन सीनमध्ये (Rajinikanth Action Scene) झळकणार आहे. ‘जेलर’ चित्रपटामध्ये (Jailer Movie) रजनीकांत बरोबरच तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia), शिव राजकुमार (Shiva Rajkumar), सुनील (Sunil) आणि योगी बाबू (Yogi Babu) हे प्रमुख कलाकार भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री रम्या कृष्णन (Ramya Krishnan) रजनीकांतच्या बायकोची भूमिका साकारणार आहे ‘रजनी द जेलर’ हा चित्रपट येत्या 10 ऑगस्ट रोजी हा प्रेक्षकांच्या भेटीस (Jailer Release Date) य़ेणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | डाबर ओडोमोसने डेंग्यू मुक्त भारत मोहीम सुरू केली; डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्याबाबत जनजागृती

ACB Trap News | 15 हजार रूपयाची लाच घेताना कार्यालयीन अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात