Jain Samaj | जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : Jain Samaj | जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज काढले. (Jain Samaj)

राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Jain Samaj)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा Jain Samaj | जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असेविचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.

Web Title : Jain Samaj | Public welfare spirit of Jain community towards society: Chief Minister Eknath Shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई