Shrimant Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पुणे : Shrimant Dagdusheth Ganpati | श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त (Sankashti Chaturthi) मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक (Nashik) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या (Sahyadri Farmers Producer Company Limited) शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. (Shrimant Dagdusheth Ganpati)

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने (Sunil Rasane), कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे (Vilas Shinde) यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण (Manik Chavan) म्हणाले, द्राक्षाच्या हंगामात सलग दुस-या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष शेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. यंदाही त्याचा प्रत्यय शेतक-यांना येत आहेत. मात्र या संकटातून बाहेर पडण्याची जिद्द शेतक-यांनी बाळगली आहे. विघ्नहर्त्या गणेशाला यानिमित्त शेतक-यांच्या वतीने साकडे घालण्यात आले. (Shrimant Dagdusheth Ganpati)

सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे.
द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत.
द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो.
द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते.
हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते.
तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते.
हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात.
त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात
द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.

Web Title : Shrimant Dagdusheth Ganpati | 2000 kg of grapes arranged in ‘Dagdusheth’ Ganapati Temple; Organizing grape festival on the occasion of Sankashti Chaturthi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई

Pune Crime News | मैत्रिणीने दोघांबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा केला प्रयत्न; विनयभंगाचा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News | दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याने वडिलांनी केला १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; वडिल, आजीविरोधात गुन्हा दाखल