Jalgaon Crime News | खासगी कामासाठी निघालेल्या शेतकऱ्याचा सिमेंटच्या ब्लॉकने केला घात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | जळगाव खुर्द या गावाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याची कल्पना यावी म्हणून ठिकठिकाणी सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आले आहेत. मात्र काल सकाळी सहा वाजता याच सिमेंटच्या ब्लॉकने एका शेतकऱ्याचा घात केला आहे. सिमेंटच्या ब्लॉकवर दुचाकी धडकल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विजय मुरलीधर पाटील (वय 65 रा. नशिराबाद) असे या अपघातात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Jalgaon Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
जळगाव तालुक्यातील नशिराबाद या ठिकाणी विजय मुरलीधर पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी खाजगी कामानिमित्ताने पाटील हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एम.एच. 19. 6933) रावेर तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी जात होते. या दरम्यान गावापासून काही अंतरावर पोहचल्यावर महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहनधारकांना कल्पना यावी म्हणून या ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आले होते. यादरम्यान वळणावर रस्त्यात टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या ब्लॉकचा अंदाज न आल्याने विजय पाटील यांची दुचाकी सिमेंटच्या ब्लॉकवर धडकली आणि पाटील हे गंभीर जखमी झाले. यानंतर या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांपैकी एकाने ओळख पटवण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या जखमीच्या खिशातील कागदपत्रे तपासले. यात विजय पाटील हे नशिराबाद येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार संबंधित वानधारकाने फोटो मोबाईलवर पाठवून नशिराबाद गावामध्ये या अपघाताची माहिती दिली. (Jalgaon Crime News)

या अपघाताची माहिती मिळताच विजय पाटील यांच्या कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय पाटील यांना तपासून मृत घोषित केले.
यानंतर शवाविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
विजय पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
या अपघाताप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Jalgaon Crime News | farmer died after hitting a cement block with a bike jalgaon nashirabad