Jalgaon Crime News | पत्नीच्या निधनाची बातमी ऐकताच काही तासांनी पतीनेही सोडला जीव

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | जळगाव जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पत्नीच्या निधनाची बातमी कळताच अवघ्या 10 तासात पतीने देखील आपले सोडले प्राण सोडले आहे. दोघांची अंतयात्रा एकत्र निघाल्याने गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सिंधुबाई दत्तात्रय वाणी (वय 75) आणि दत्तात्रय गणपत वाणी (वय 85) अशी मृतांची नावे आहेत. सातगाव डोंगरी गावावर यांच्या मृत्यूने सध्या शोककळा पसरली आहे. (Jalgaon Crime News)

मयत पती-पत्नी पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी भागात वास्तव्यास होते. गेल्या काही दिवसांपासून दोघेही आजारी होते. सिंधुबाई यांचे निधन 21 नोव्हेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास झाले. यानंतर घराजवळील आरडाओरड आणि रडण्याच्या आवाजाने दत्तात्रय यांना शंका आली. दत्तात्रय देखील आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होते. या आरडा ओरडण्याने त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याची माहिती त्यांना मिळाली. यामुळे त्यांना धक्का बसला. आपली पत्नी आता या जगात नाही ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही. यावेळी त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हते. आपली अर्धांगिनी आपल्याला सोडून गेली याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. तर दुसऱ्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनीही आपला जीव सोडला. (Jalgaon Crime News)

तर बुधवारी सकाळी या दोघांची अंतयात्रा सोबत निघाली.
आजवर हे दोघे जगलेही सोबत आणि मृत्यूही सोबत अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
अशी घटना गावात पहिल्यांदाच घडली आहे.
दोघांची अंत्ययात्रा एकदमच निघाल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी तरंगले.
या दोघांच्या मृत्यूने वाणी कुटुंबासह गावातील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. तर सिंधुबाई आणि दत्तात्रेय यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title :- Jalgaon Crime News | husband dies after listening about his wife demise in jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | धक्कादायक ! आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

MPSC | नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, आयोगाकडून विद्यार्थ्यांची मागणी मान्य

Pune Kasba Peth Bypoll Election | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा भाजप उमेदवार हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा