MPSC | नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, आयोगाकडून विद्यर्थ्यांची मागणी मान्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एमपीएससी च्या (MPSC) विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) मान्य केली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून एमपीएससी (MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन (MPSC Student Agitation) सुरु होतं. राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहिर केल्याने पुण्यातील झाशीची राणी चौकात विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यासंदर्भात ट्विट करुन निर्णय जाहीर केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचार घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

MPSC विद्यार्थ्यांचे 20 फेब्रुवारीपासून आंदोलन

सोमवारपासून (दि. 20) पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरे आंदोलन होते.
जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारने नवीन परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती.
मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर तीन आठवडे उलटले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
सरकाने आश्वासन दिल्यानंतर देखील आदेश न काढल्याने विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केले होते.

Web Title :- MPSC | mpsc big decision revised examination plan and syllabus is being implemented from the year 2025

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसब्यात हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप प्रचंड बहुमतांनी जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

Thane Crime News | ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा दिली म्हणून तरुणांवर गुन्हा दाखल, ठाण्यातील घटना

Mumbai Crime News | इन्स्टा मैत्री पडली महागात ! पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने मित्राने महिलेला 2 लाखात विकले