Jalgaon Crime News | मित्राच्या बायकोला घरी बोलवून आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | जळगावमध्ये मैत्रीच्या नावाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने आपल्याच मित्राच्या बायकोचा विनयभंग केला आहे. “तू जर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही तर तू तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव”, अशी धमकी देवून आरोपीने 20 वर्षीय विवाहितेला त्याच्या घरी बोलवून विनयभंग केला आहे. या प्रकरणी विनयभंग करणाऱ्या पतीच्या 30 वर्षीय मित्रास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Jalgaon Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील एका भागात हि पीडित 20 वर्षीय महिला पती व सासू-सासऱ्‍यांसह राहते. आरोपी मित्र हा महिलेच्या पतीसोबत अधूनमधून घरी येत होता. दीड महिन्यापासून आरोपी मित्राच्या पत्नीशी फोन करून बोलण्याचा प्रयत्न करत होता. तसेच विवाहितेसोबत वेळोवेळी वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आणि विवाहितेला बळजबरीने त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होता.

मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पतीच्या मित्राने पीडित महिलेला कॉल करून “तुझ्याशी अर्जंट काम आहे, तू लवकर माझ्या घरी ये”, असे सांगितले. त्याच्या या बोलण्यावर पीडित महिलेने विश्वास ठेवला आणि ती त्याच्या घरी गेली. यानंतर आरोपी मित्राने विवाहितेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर “तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव”, असे म्हणू लागला. विवाहितेने या सगळ्याला नकार दिल्यावर त्याने “तू जर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव”, असे म्हणत विवाहितेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. (Jalgaon Crime News)

या सगळ्या प्रकाराला पीडित महिला घाबरली आणि तिने तातडीने त्या ठिकाणाहून पळ काढत आपले घर गाठले
आणि आपल्या पतीला घडलेला सगळा प्रकार सांगितला.
यानंतर तिने व तिच्या पतीने बुधवारी दुपारी 3 वाजता रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून आरोपी मित्राविरोधात
तक्रार दाखल केली. रामानंदनगर आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलीस हवालदार निलेश पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Jalgaon Crime News | where a friend wife was invited to his home and molested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून आधी त्यानं फसवलं, नंतर परिचयातील व्यक्तीने 7.5 लाखांना गंडवलं; पिंपरी परिसरातील घटना

MLA Rohit Pawar | ‘शरद पवारांच्या नादाला कोणी लागू नये, लागलात तर तुमचं…’, रोहित पवारांचा सूचक इशारा