Jalgaon Dudh sangh | सासूबाईंच्या विरोधात सूनबाई, जळगाव दूधसंघ निवडणूक; रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लवकरच जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक (Jalgaon Dudh Sangh Elections) होणार आहे. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तसेच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व शिंदे गट या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. एकनाथ खडसे व गिरीश महाजन एकमेकांचे कट्टर वैरी समजले जातात. या निवडणुकीसाठी (Jalgaon Dudh sangh elections) दोघांनी लावलेली शक्ती आणि एकमेकांविरोधात केलेली विधाने पाहता ते स्पष्ट होते. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

त्यातच आणखी एका कारणामुळे या निवडणुकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. ते म्हणजे एकनाथ खडसे यांची सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे या एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरोधात करत असलेला प्रचार. महाराष्ट्राचे सासू विरोधात सून वादावरचे प्रेम महाराष्ट्रीयन टीव्ही मालिकांवरून स्पष्ट दिसते. त्यामुळे सासूच्या विरोधातील सुनेच्या प्रचाराची लढाई राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे. (Jalgaon Dudh sangh)

जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक जळगावच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची निवडणूक असून १० डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल, तर दुसऱ्या दिवशी ११ डिसेंबर रोजी निकाल लागेल.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलकडून मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे
उभ्या आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी दंड थोपटले आहेत.
मंगेश चव्हाण यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर येथे
रविवारी शिंदे-भाजप गटाच्या शेतकरी पॅनलचा मेळावा पार पडला.
यावेळी स्वतःच्या सासूविरोधात सूनबाई रक्षा खडसेंची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
या मेळाव्याला भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, भाजपच्या खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील,
आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते.

Web Title :- Jalgaon Dudh sangh |maharashtra political news eknath khadse wife manda khadse vs daughter in law bjp mp raksha khadse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Malaika Arora | ‘छैया छैया’ या गाण्यासाठी मलायका अरोरा नव्हे, तर शिल्पा शेट्टीसह ‘या’ अभिनेत्रींना दिली होती ऑफर

Thane ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात