Malaika Arora | ‘छैया छैया’ या गाण्यासाठी मलायका अरोरा नव्हे, तर शिल्पा शेट्टीसह ‘या’ अभिनेत्रींना दिली होती ऑफर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Malaika Arora | आजपर्यंत अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडने प्रेक्षकांना दिली आहेत. त्यातील काही गाणी आजदेखील प्रेक्षक गुणगुणताना दिसत असतात. त्यातीलच एक गाणं म्हणजे ‘छैया छैया’ या गाण्याने तर सगळ्यांनाच वेड लावलं होतं. मनिरत्न यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातील या गाण्याने चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. (Malaika Arora)

 

धावत्या रेल्वेमधील हे गाणे सगळ्यांना खूपच आवडल्याचे दिसत होते. आता या गाण्यामागील एक रोमांचक गोष्ट समोर आली आहे. (Malaika Arora)

 

या गाण्यासाठी निर्मात्यांची पहिली निवड मलायका नव्हतीच. तिच्या आधी पाच अभिनेत्रींना या गाण्यासाठी विचारण्यात आले होते. मात्र, धावत्या ट्रेनमध्ये हे गाणे रेकॉर्ड करण्यास या पाचही अभिनेत्रींनी नकार दिला होता. यानंतर या गाण्यासाठी मलायकाची निवड करण्यात आली होती. यामागील किस्सा नुकताच चित्रपट निर्माती व कोरिओग्राफर फराह खानने सांगितला आहे. अलीकडेच फराहने मलायकाच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या वेब शोमध्ये हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात फराहने मलायकाची निवड या गाण्यासाठी कशा पद्धतीने झाली हे सांगितले.
यावेळी ती आठवण सांगताना फराह म्हणाली, “सुदैवाने तुझी निवड छैया छैया या गाण्यात झाली होती.
तिथूनच तुला छैया छैया गर्ल म्हणून नाव पडले. तूदेखील या गाण्यासाठी रडारड करत होतीस.
मात्र, तुला समजावल्यानंतर तू हे गाणे करण्यास तयार झाली होती. आम्ही या गाण्यासाठी तुझा विचारच केला नव्हता. तुझ्या आधी शिल्पा शेट्टी कुंद्रा, शिल्पा शिरोडकर आणि इतर दोन-तीन अभिनेत्रींशी आम्ही या गाण्यासाठी संपर्क साधला. मात्र, चालत्या ट्रेनमध्ये हे गाणं शूट करण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. शेवटी एका मेकअप आर्टिस्टने मलायकाचे नाव सुचवले. तू खूप चांगली नाचतेस असे त्यांनी सांगितले. यानंतर तुला शूटिंगसाठी ट्रेनमध्ये चढवलं तेव्हा हे गाणं कसं होईल असा विचार आमच्या मनात आला. मात्र, हे गाणं कसं झालं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे आणि तुम्हाला माहीतच आहे,” अशी एक रोमांचक गोष्ट फराहने एवढ्या वर्षांनी उघड केली आहे.

 

Web Title :- Malaika Arora | malaika arora was not the first choice for shahrukh khan chaiyya chaiyya song reveals farah khan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम’ – देवेंद्र फडणवीस

Shreya Bugade | श्रेया बुगडे ‘या’ विनोदवीराची चाहती; त्याच्यासाठी केली खास पोस्ट शेअर

Uddhav Thackeray | ‘महाविकास’ सरकार पाडण्यासाठी आर्थिक रसद पुरविणार्‍याबाबत शिवसेनेने केला मोठा दावा,

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे