Jalgaon Police Recruitment | WhatsApp च्या माध्यमातून पोलिस भरतीचा पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं (व्हिडीओ)

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Police Recruitment | जळगाव पोलीस शिपाई भरती (Jalgaon Police Recruitment) परीक्षेचा शनिवारी (दि. 9) लेखी पेपर होता. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात (examination center) व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून (WhatsApp) पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात (Dharangaon police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात (Jalgaon Taluka Police Station) दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, पोलिस शिपाई भरती (Jalgaon Police Recruitment) 2019 ची प्रक्रीया सुरू झाली आहे. यात जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर 128 पदांसाठी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता जळगाव व भुसावळ शहरातील 68 केंद्रांवर 21 हजार 690 उमेदवारांची 100 गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आली. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही परीक्षा केंद्र होते. याठिकाणी योगेश रामदास आव्हाड Yogesh Ramdas Awhad (रा.पांझनदेव, पोस्ट.नागपूर जि.नांदगाव) या परीक्षार्थी तरुणाने परीक्षा केंद्रात नजर चुकवून मोबाईल आणला होता.

 

 

योगेशने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका (Question paper) आपल्या एका मित्राला पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने प्रश्नांची उत्तर सोडवून त्याला पाठवायला सुरुवात केली. हा प्रकार सहायक पोलीस निरीक्षक देवरे (API Devre) यांच्या लक्षात आल्यानंतर योगेशला तात्काळ परीक्षाकेंद्राच्या बाहेर नेत चौकशी केली. याप्रकरणी योगेश रामदास आव्हाड आणि त्याचा मित्र (नाव निषपन्न नाही) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

दरम्यान, जळगांव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगांव येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी उमेदवार प्रतापसिंग गुलचंद बालोद (Pratap Singh Gulchand Balod) बैठक क्रमांक 7217059 हा परीक्षेत गैरप्रकार करत असतांना निदर्शनास आला आहे. या परीक्षार्थीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

परीक्षा केंद्रावर मोबाईल, आक्षेपार्ह वस्तूंना होती बंदी
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे (SP Dr. Pravin Munde) यांनी सांगितले, परिक्षा केंद्रावर पेन, पेन्सील, रबर,
प्रवेशपत्र व शासकीय कामकाजासाठी ग्राह्य असलेले फोटोचे ओळखपत्र ऐवढ्याच वस्तु उमेदवारांनी आणने अपेक्षित होते.
मोबाईल, आक्षेपार्ह वस्तुंना बंदी घालण्यात आली होती. या वस्तु आणल्यास उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येणार होते.

 

Web Title :- Jalgaon Police Recruitment | Trying to solve police recruitment paper through WhatsApp; The candidate was caught red handed (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | धनकवडीमधील शेवटचा बसस्टॉप येथे ‘विठू माऊली भक्ती शिल्पा’चे लोकार्पण

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीचा खून करुन मृतदेह पुरला; पुण्याच्या दौंड येथील घटना

Devendra Fadnavis | IT च्या छाप्यांवरून देवेंद्र फडणवीसांनी साधला अजित पवारांवर निशाणा, केले गंभीर खुलासे; म्हणाले…