Jalgaon Suicide News | दसऱ्याच्या दिवशी आई-वडीलांवर मोठा आघात, पोलिसाच्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : Jalgaon Suicide News | शहरातील आशाबाबा नगरात अभिषेक सुभाष राठोड Police Officer Abhishek Subhash Rathore (२२, रा. आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा) या तरुणाने दसऱ्याच्या दिवशी रात्री रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या (Jalgaon Suicide News) केल्याची धक्कादायक घटना घडली. अभिषेक हा पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचारी सुभाष राठोड यांचा मुलगा होता.

अभिषेकने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी (Ramanand Nagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राठोड कुटुंबिय जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहते. मयत अभिषेकच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

अभिषेक मुंबईतील एका विधी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. बाईक अपघातात जखमी झाल्याने तो दीड महिन्यापासून घरी जळगावला होता. मंगळवारी दसरा सण सर्वत्र आनंदात साजरा होत असताना रात्रीच्या वेळी अभिषेक घरातून बाहेर पडला आणि त्याने आशाबाबा नगर परिसरात धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या (Jalgaon Suicide News) केली.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयताच्या जवळ सापडलेल्या मोबाईलच्या आधारे अभिषेकची ओळख पटली.

अभिषेक मित्राकडे किंवा बाहेर गेला असावा, असे घरच्यांना वाटल्याने ते निर्धास्त होते.
परंतु, अचानक अभिषेकच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.
अभिषेकच्या घरात दसरा सण मोठ्या आनंदात साजरा केला जात होता, मात्र काही क्षणातच तिथे आक्रोश सुरू झाला आणि शोककळा पसरली.

या प्रकरणाचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र तावडे करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | मंत्री चंद्रकांत पाटील हे मिलिंद तुळाणकर यांच्या जलतरंगाने प्रभावित

Uddhav Thackeray | महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पीएम मोदींना उद्धव ठाकरेंची विनंती, ”त्यांचे स्वागत आहे, त्यांनी..!”