नवीन वीज जोडणीसाठी दहा हजाराची लाच घेताना सहायक अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

जळगाव: पोलीसनामा आॅनलाइन
नवीन वीज कनेक्शनसाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ‘एमएसईबी’च्या सहाय्यक अभियंत्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

राकेश लक्ष्मण भंगाळे (वय: 35,थोरगव्हाण.ता.रावेर) असे अभियंत्याचे नाव असून त्याने तक्रारदार यांच्याकडे (दि.२७ एप्रिल) रोजी नवीन वीज कनेक्शनसाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. यावेळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अभियंत्यास दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई जळगाव लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक जी.एम. ठाकूर यांच्या पथकाने केली.