मी केवळ भजन गातोय, साधू-संत नाहीः जलोटा

मुंबई : वृत्तसंस्था

भजन सम्राज अनुप जलोटा यांनी बिग बॉस १२ च्या सोहळ्यादरम्यान आपल्याला गर्लफ्रेंड असल्याचे सांगून सर्वांनाचा आश्चर्य़ाचा धक्का दिला होता. यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जलोटा यांनी आपली बाजू मांडताना म्हणाले लोकांना वाटत असेल की, मी भजन गातोय म्हणजे साधू-संत असेल, पण असं आजिबात नाही. मी खूप मस्तीखोर, जीवनात आनंद उपभोगणारा, आयुष्य जगताना मज्जा करणारा आणि मनमुराद आनंद लुटणारा आहे’, आणि हे तुम्हाला ‘बिग बॉस’मध्ये पाहायला मिळेल.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2bd27ac1-bb42-11e8-9dd9-fb6c3bf4d3fa’]

अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारु यांची सध्या जोरदार चर्चा आहे. ६५ वर्षाच्या अनूप जलोटा यांची गर्लफ्रेंड ही त्यांच्यापेक्षा तब्बल ३७ वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या नात्यासंबंधीही सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगत आहे. या दोघांना त्यांच्या नात्यांवरुन ट्रोलचा सामनाही करावा लागला आहे.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की 

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याआधी अनूप जलोटा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधला होता. बिग बॉसच्या अन्य स्पर्धकांच्या तुलनेत मी वयाने खूप मोठा आहे. परंतु, विचाराने त्यांच्यापेक्षा तरुण आहे. लोकांना वाटतेय की, मी भजन गातोय तर तो साधू-संत असेल. परंतु, असं आजिबात नाही. मी आयुष्यात मज्जा करतोय आणि हे तुम्हाला बिग बॉसमध्ये दिसेल. त्यासाठी तुम्ही बिग बॉस पाहा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आहे ‘हा’ आजार 

बिग बॉस शोमध्ये येण्याआधी तीन वर्षापासून मी अनूप जलोटा यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. व याविषयी माझ्या आई-वडिलांना माहिती नाही, अशी कबुली जसलीन हिनं दिलीय. तर जसलीनसोबत रिलेशनशीपमध्ये येण्याआधी अनूप जलोटा यांचे तीन लग्न झालेले आहेत.

जस्लीनचे वडील म्हणतात…
‘जस्लीन बिग बॉसच्या १२ व्या पर्वात सहभागी होणार हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे आम्ही आनंदीदेखील होतो. परंतु ज्यावेळी अनुप जलोटा यांनी जस्लीनविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं ते ऐकून आम्हीदेखील आश्चर्यचकित झालो. सध्या जस्लीन बिग बॉसचा खेळ खेळत आहे. त्यामुळे आतातरी तिच्याशी याविषयावर चर्चा करता येणार नाही. मात्र ती जेव्हा या घरातून बाहेर पडेल तेव्हा नक्कीच तिच्याशी याबद्दल बोलणार असल्याचं’ केसर मथारु यांनी सांगितलं.

[amazon_link asins=’B07418TNB1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4fcbc4d3-bb42-11e8-b219-539d1a12f50d’]

पुढे ते असंही म्हणाले, ‘जस्लीन एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्मलेली मुलगी आहे. तिने तिच्या हिमतीवर या कलाक्षेत्रात स्वत:चं नाव कमावलं आहे. त्यामुळे तिला अशा खोट्या आणि वाईट मार्गाने निर्माण होत असलेल्या प्रसिद्धीची गरज नाही. सध्या तिच्याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र यावरुन आम्हाला काही फरक पडत नाही. ती बिग बॉसच्या या पर्वाची विजेती व्हावी हिच आमची इच्छा आहे’.