४५ वर्षीय भाजप नेत्याचं २७ वर्षीय महिला कार्यकर्त्याशी ‘सुत’ जुळलं, केला ३ रा ‘विवाह’

गुजरात : पोलीसनामा ऑनलाइन टीम – गुजरातमधील एका ४५ वर्षीय भाजपच्या नेत्याचा तिसरा विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. भाजप नेता शंकरभाई अमलियार हे दाहोद विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी नुकतेच दाहोद विभागाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सोबत विवाह केला आहे. दाहोद जिल्हयातील फतेपुरा तालुक्यातील सिगडापाडा गावाचे रहिवाशी असलेले शंकरभाई अमलियार हे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

शंकरभाई यांचा पहिला विवाह फतेपुराचे आमदार रमेश कटारा यांच्या बहिणीसोबत झाला होता. त्यांना चार मुले आहेत. शंकरभाई यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू सन २०१० मध्ये झाला. त्यानंतर सन २०११ मध्ये शंकरभाई यांनी जलोडेच्या ज्योत्सनाबेन सोबत दुसरा विवाह केला. मात्र, त्यांचे आपआपसात कधीही सुत जुळले नाही. घरगुती वादामुळे वर्षभरापर्वी शंकरभाई आणि ज्योत्सनाबेन हे वेगवेगळे झाले. त्यानंतर २० जून रोजी शंकरभाई यांनी त्यांच्यापेक्षा १८ वर्षाने लहान असलेल्या जल्पाबेन यांच्याशी विवाह केला. जल्पाबेन या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. गेल्या काही वर्षापासुन त्या राजकारणात सक्रिय आहेत. सध्या जल्पाबेन या जिल्हयातील महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असुन त्या दाहोदमध्ये एमएससीच्या दुसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत
मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे
सावधान ! मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो ‘ब्रेन कँन्सर’
लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करा…आणि कॅलरीज होतील बर्न