भारतीय लष्कराकडून PAK ला ‘ठासून’ उत्तर, पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा ‘खात्मा’, 2 चौक्या ‘उध्दवस्त’, सलग होणार्‍या गोळीबारानं वाढला ‘तणाव’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेत (LOC) युद्धबंदीच्या उल्लंघनास भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पुंछमधील कृष्णा खोरे आणि मनकोटच्या गोळीबाराला उत्तर देत भारतीय सैन्याने 10 पाकिस्तानी सैनिक ठार मारले. या हल्ल्यात पाकिस्तान-व्याप्त काश्मीरच्या (POK) बट्ट्ललमध्ये दोन चौक्या उद्ध्वस्त झाल्या, तर इतरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारीही सैन्याने उरी सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी सैनिक मारले. गेल्या दोन दिवसांत 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडे ठार झालेल्या सैनिकांची संख्याही जास्त असू शकते. गुरुवारी रात्री कारवाईनंतर पाकिस्तानी लष्कराच्या डझनभर रुग्णवाहिका शुक्रवारी सकाळी बट्टालमध्ये सैनिकांचे मृतदेह घेऊन जाताना दिसल्या.

भारतीय सैन्याच्या कारवाईमुळे झालेल्या नुकसानीची बातमी समोर येऊ नये म्हणून पाकिस्तानी लष्कराने बट्टाल परिसरातील नागरिकांना घरांमध्येच राहण्याचे निर्देश दिले आहेत. सैनिकांच्या मृत्यूने संतप्त झालेल्या पाकिस्तानने दुपारी नंतर राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार केला. चौक्यांसोबतच असलेल्या निवासी भागांना त्यांनी लक्ष्य केले. कलाल आणि डिंगमध्ये गोळीबार केला. गोळीबारात डिंगमधील ग्राफ विभागाच्या बॅरेक्स आणि मशीन्सचे नुकसान झाले. तेथे पहारेकरी आणि कर्तव्यावर असणार्‍या इतरांनी जवळच्या बंकरमध्ये लपून त्यांचे प्राण वाचवले.

या स्फोटांचे आवाज नौशेहरा शहरापर्यंत ऐकू गेले. दुपारी 1 वाजता सुरू झालेला हा गोळीबार दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू राहिला. राजौरी येथील सुंदरबानी येथे पाकिस्तानने तोफ डागले. त्याचवेळी सिलिकूट, हाथलंगा, मोथल, सोव्हरा, बालाकोट, चुरंदा आणि आसपासच्या भागात लक्ष्य करून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी लोक आपली घरे सोडण्यास घाबरत होते.

सतत गोळीबार करत दबाव आणण्याचा प्रयत्न :
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केल्यामुळे एलओसीवर तणाव निर्माण झाला आहे. सैनिकांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुधवारी पाकिस्तानच्या गोळीबारात उरी सेक्टरमध्ये एक जेसीओ ठार झाला आणि चुरंदा गावात एका महिलेचा मृत्यू झाला. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच आयबीवर रात्रभर गोळीबार, ड्रोनची पाळत ठेवणे, भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील (सीबी) युद्धबंदीचे उल्लंघन सुरू आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेपासून हिरानगर सेक्टरच्या चांदवान पोस्टवर सुरु असललेला गोळीबार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होता. या काळात निवासी भागांनाही लक्ष्य केले गेले. यात दोन टिन शेड व पाण्याची टाकी खराब झाली आहे. लष्कराने त्या भागावर ड्रोनद्वारे निरीक्षण केले.

तीन हजार वेळा पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन :
यावर्षी आतापर्यंत पाकिस्तानने सुमारे 3 हजार वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याच्या उद्देशाने आणि बॉर्डर अ‍ॅक्शन टीम (बीएटी) च्या कारवाईवरून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे, परंतु पाकिस्तानी सैन्याला कोणत्याही परिस्थिती फायदा घेऊ दिला जाणार नाही, असे लष्करी सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चीनने शुक्रवारी दोन्ही देशांना भारत-पाक नियंत्रण रेषेवर शांतता बाळगण्यासाठी अपील केले आहे. वाढत तणाव रोखण्यासाठी दोन्ही देशांनी संयम राखून कार्य करावे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुंग म्हणाले, “आम्ही संबंधित अहवाल पाहिला आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत.”

ते म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे शेजारी म्हणून आम्ही दोन्ही बाजूंना आवाहन करतो की तणाव वाढू नये अशा कृती करण्यास संयम पाळा.” दोन्ही देशांनी वादातून शांततेने वाटाघाटी करावीत आणि एकत्रितपणे प्रादेशिक शांतता व स्थिरता राखली पाहिजे. बुधवारपासून पाकिस्तान युद्धबंदीचे उल्लंघन करीत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/