फारुख अब्दुल्लांच्या घरात कार घुसवण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांनी संशयिताला केलं ठार

जम्मू : वृत्तसंस्था 

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला ज्या वसाहतीत राहतात, त्यामध्ये एका व्यक्तीने बॅरिकेट तोडून कार आतमध्ये घुसवली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी चालकावर गोळीबार केला. फारुख अब्दुल्ला बठिंडी भागात राहतात.

सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात कार चालकाला गोळ्या लागल्या, ज्यानंतर त्याला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बठिंडी भागात फारुख अब्दुल्ला यांच्याशिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे इतरही मोठे नेते राहतात. या भागात चौफेर कडेकोट बंदोबस्त असतो.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ebcd4707-97ba-11e8-b4c3-1bc174e2c9c4′]
या घटनेवेळी फारुख अब्दुल्ला घरात नव्हते. फारुख अब्दुल्ला यांचं घर वसाहतीच्या उजव्या बाजूला आहे. या घटनेला सध्या दहशतवादी घटनेशी जोडता येणार नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. ही एक घटना असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची प्रत्येक दृष्टीकोनातून चौकशी केली जात आहे.

Loading...
You might also like