आता जम्मू-काश्मीर बनणार औषध निर्मितीचं ‘हब’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम ३७० रद्द केल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये अनेक कंपन्या गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. जम्मू काश्मीर आणि लद्दाख भागात फार्मा कंपन्यांचा विकास होण्याची शक्यता अधिक आहे. जम्मू पहिल्यापासूनच औषध उद्योगाचे केंद्र आहे आता मात्र संपूर्ण राज्यात या कंपन्या उद्योग सुरु करु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१२०० ते १४०० कोटी रुपयांचा उद्योग

जम्मू काश्मीरमध्ये सध्या १२०० ते १४०० कोटी रुपयांचा उद्योग आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात हा उद्योग २० टक्के मोठा आहे. जम्मूमध्ये सध्या ल्युपिन, सन फार्मा, कॅडिला फार्मास्यूटिकल्स सारख्या कंपन्या आपला उद्योग पाहत आहेत. जम्मू मध्ये सध्या जवळपास ५० फॅक्टरी आहेत.

संपूर्ण देशाच्या तुलनेत जम्मू काश्मीरमध्ये वीज स्वस्त आहे. जम्मूत वीजेचा दर २ रुपये प्रति यूनिट आहे. तर देशात इतर राज्यात हाच दर ६ ते ७ रुपये प्रति युनिट आहे. परंतू येथे वीजेचा खप कमी आहे.

औषध उद्योगांशी संबंधित लोकांचे म्हणणे असे आहे की औषध क्षेत्राचा विकास यावर निर्भर आहे की सरकार त्यांना किती प्रोस्ताहन देते. थंड वातावरण औषध निर्मितीसाठी अत्यंत चांगले समजले जाते. कारण अनेक औषधी ही कमी तापमानात ठेवावी लागतात.

येथील अनेक औषध कंपन्या एक्यूट केअरच्या औषधांशी संबंधित आहेत. आधिकतर कंपन्या जम्मू आणि काही श्रीनगरध्ये औषध निर्मिती करतात. आता हा उद्योग अधिक वाढवण्यासाठी या कंपन्या त्यासाठी धोरण आखत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त