‘कारगिल’ वॉरमध्ये दिली दुश्मनाला जोरदार ‘टक्कर’, मिळालं ‘शौर्य चक्र’, त्याच गुंजनची कहाणी घेऊन येतेय जान्हवी कपूर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर स्टारर गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. फिल्ममेकर करण जोहरनं याबाबत घोषणा केली आहे. करण जोहरन यानं ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना करण म्हणतो, “तिच्या प्रेरणादायी प्रवासानं इतिहास रचला. ही तिची कहाणी आहे. गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल. लवकरच येत आहे नेटफ्लिक्सवर.” ज्या गुंजनवर हा सिनेमा तयार केला जात आहे ती गुंजन आहे तरी कोण हे आपण जाणून घेऊयात.

https://twitter.com/karanjohar/status/1270227046937948160

कोण आहे गुंजन सक्सेना ?
गुंजन सक्सेना लखनऊची आहे. लहानपणापासूनच तिला पायलट व्हायचं होतं. तिनं जग काय म्हणेल याची पर्वा न करता वडिलांवर विश्वास ठेवला. तिचे वडिल कायमच म्हणायचे की, प्लेन मुलानं चालवलं काय किंवा मुलीनं चालवलं काय त्याला पायलटच म्हणतात.”

1999 च्या कारगिल युद्धात गुंजन सक्सेना हिनं चित्ता हेलिकॉप्टर उडवलं होतं. देशाची रक्षा करत वॉर झोनमध्ये येणारी ती पहिली वुमेन एअरफोर्स ऑफिसर बनली आणि इतिहास बदलला. गुंजन सक्सेनाला या बहादूर आणि धाडसी कार्यासाठी भारत सरकारनं शौर्य चक्र देऊन सन्मानित केलं.

गुंजन सक्सेनाचे वडिल आणि भाऊदेखील सेनेतच होते. तिनं दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजातू ग्रॅज्युएशन केलं आणि त्या काळात महिला पायलट भरतीसाठी अर्ज केला. एसएसबी उत्तीर्ण होत ती वायुसेनेत समाविष्ट झाली.