Janhvi Kapoor | जान्हवीने तिच्या सहकलाकाराला लगावली कानशिलात; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये सध्या जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) व अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) या ऑन स्क्रीन कपलची चर्चा आहे. जान्हवी व वरुण यांचा बवाल चित्रपट (बवाल चित्रपट) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अनेक दिवसांपासून जान्हवी व वरुण हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होते. प्रेक्षकांना या दोघांची ऑनस्क्रीन जोडी आवडली असून अनेकांनी त्यांच्या चित्रपटातील अभिनयाचे कौतुक केले आहे. मात्र सध्या जान्हवीचा (Janhvi Kapoor) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जान्हवीने वरुणच्या कानशिलात लगावली आहे.

https://www.instagram.com/p/Cu9DyvkoCwI/?igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री जान्हवी कपूर ही स्टार किड असलेली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रीदेवीची (Sridevi) मुलगी असलेल्या जान्हवीने करण जोहरच्या (Karan Johar) ‘धडक’ चित्रपटामधून (Dhadak Movie) बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या असून आता तिचा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर जान्हवी कपूर ट्रोल (Janhvi Kapoor Troll) होत आहे. कारण जान्हवीने वरुण धवनला कानाखाली मारली आहे. एका प्रमोशन दरम्यान वरुण धवन बोलत असतो. यावेळी तिने अचानक वरुण धवनला कानाखाली मारली व हसायला लागली. यावर तिने एक जोक केला त्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. जान्हवी वरुणला कानाखाली मारुन म्हणाली की “तुझा गाल चापट मागत होता”. तिच्या या बोलण्यावर असभ्य वागण्यावर वरुण धवनचे चाहते नाराज झाले आहेत.

अभिनेत्री जान्हवी कपूरने अभिनेता वरुण धवनला मारलेला व्हिडिओ (Janhvi Slaps Varun Dhawan) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने वरुणला विनाकारण चापट मारलेले पाहून नेटकरी जान्हवीवर नाराज झाले असून अनेकांनी कमेंट करत तिला खडे बोल सुनावले आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ही काय वेडी आहे का जरा? यांच्या डोक्यात मेंदूऐवजी शेण भरलेले आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “हे पूर्णपणे असभ्य वर्तन आहे !!!!!!!!! जान्हवी हे इतर कोणत्याही अभिनेत्यासोबत करेल का?!!!!” एका नेटकऱ्याने म्हटलं, “एखाद्या मुलाने असं म्हटलं आणि मुलीला चापट मारली तर?” तर दुसरा नेटकऱ्याने लिहिले आहे की, परत हिला पण अशीच बसली असती तर मज्जा आली असती” सोशल मीडियावर जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ट्रोल होत असून याबाबत दोघांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Allu Arjun | अल्लू अर्जुनने केला पुष्पा 2 चित्रपटाचा डायलॉग रिव्हिल;  यावेळी पुष्पा फ्लॉवर नाहीतर आहे…