Janmashtami | जन्माष्टमी 30 ला, जाणून घ्या केव्हापासून कुठपर्यंत असेल ‘अष्टमी तिथी’, पूजा विधी आधि शुभ मुहूर्त

पोलीसनामा ऑनलाइन : Janmashtami | यावेळी 30 ऑगस्ट, सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजे जन्माष्टमी (Janmashtami 2021) साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार द्वापर युगात याच तिथीवर भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. यावेळी हा उत्सव खुपच विशेष आहे कारण अनेक वर्षांनंतर स्मार्त आणि वैष्णव हा उत्सव एकाच दिवशी साजरा करतील. दुसरे कारण हे सुद्धा आहे की, यावेळी ग्रह-नक्षत्रांचा असा विशेष योग बनत आहे जसा द्वापर युगात श्रीकृष्ण जन्माच्यावेळी झाला होता.

या दिवशी देशभरात कृष्ण मंदिरांमध्ये विशेष आयोजन केले जाईल. जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त :

या विधीने करा पूजा-व्रत

– जन्माष्टमी (Janmashtami 2021) च्या दिवशी सकाळी लवकर उठा आणि स्नान इत्यादी केल्यानंतर सर्व देवतांना नमस्कर करा पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून व्रताचा संकल्प करा (जे व्रत तुम्ही करू शकता तसा संकल्प करा जर तुम्हाला फलाहार करून व्रत करायचे असेल तर तसा संकल्प करा आणि जर एकवेळ जेवण करून व्रत करायचे असेल तर तसा संकल्प करा).

– यानंतर माता देवकी आणि भगवान श्रीकृष्णाची सोने, चांदी, तांबे, पितळ अथवा मातीची (यथाशक्ती) मूर्ती किंवा चित्र पाळण्यात स्थापन करा. भगवान श्रीकृष्णाला नवीन वस्त्र अर्पण करा. पाळणा सजवा.

– यानंतर श्रीकृष्णाची पूजा करा. पूजेत देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मी इत्यादींची नावे घ्या. शेवटी माता देवकीला अर्ध्य द्या. भगवान श्रीकृष्णाला फूल अर्पण करा.

Pune Police | पुण्याच्या कोंढाव्यातील ‘रेश्मा’वर ‘एमपीडीए’ची कारवाई; प्रथमच सराईत महिलेला स्थानबद्ध करुन येरवडा जेलमध्ये पाठवलं

– रात्री 12 वाजल्यानंतर श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करा. पाळण्याला झुलवा. पंचामृतात तुळशीपत्र टाकून आणि लोणी मिश्रीत प्रसाद अर्पण करा. आरती करा आणि  स्त्रात्र, भगवद्गीतेचे पठन करा.

– दुसर्‍या दिवशी पुन्हा स्नान करा ज्या तिथीला आणि नक्षत्रात व्रत केले असेल त्याच्या समाप्तीवर व्रत पूर्ण करा.

पूजेचा शुभ मुहूर्त-

अष्टमी तिथी प्रारंभ : 29 ऑगस्ट रात्री 11 वाजून 26 मिनिटांनी सुरू.
अष्टमी तिथी समाप्त : 30 ऑगस्ट रात्री उशीरा 2 वाजता.
रोहिणी नक्षत्र : 30 ऑगस्टला पूर्ण दिवस, पूर्ण रात्र पार करून 31 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 44 मिनिटापर्यंत.

पूजेसाठी मुहूर्त : 30 ऑगस्टला रात्री 11 वाजून 59 मिनिटापासून रात्री उशीरा 12 वाजून 44
मिनिटापर्यंत आहे. हा मुहूर्त 45 मिनिटाचा असेल.

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री ठाकरेंशी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत फडणवीसांनी केला खुलासा, म्हणाले…

Pune Farmer Suicide | पुणे जिल्ह्यात शेतकर्‍याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये अजित पवारांना निवेदन दिल्याचा उल्लेख

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : janmashtami | Janmashtami 2021 on 30th august know shubh muhurat puja vidhi and shri krishna aarti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update