जपानमधील ‘हे’ थिएटर बंद होण्याआधी दाखवण्यात आला आमिर खानचा ‘3 इडियट्स’

पोलीसनामा ऑनलाइन – राजकुमार हिरानी दिग्दर्शित 3 इडियट्स हा सिनेमा एका दशकापूर्वीच रिलीज झाला आहे. आजही हा सिनेमा जगभरात प्रसिद्ध सिनेमा म्हणून ओळखला जातो. चीनसारख्या देशातही सिनेमानं चांगली कमाई केली आहे होती. याशिवाय हा सिनेमा तायवान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि जपानमध्येही रिलीज करण्यात आला होता.

जपानच्या ओसाकामधील एक थिएटर कायमचं बंद केलं जाणार होतं. यावेळी त्यांनी या थिएटरमध्ये शेवटचा सिनेमा म्हणून 3 इडियट्स सिनेमा दाखवण्यााचा निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही तर आमिर खानचा हा सुपरहिट सिनेमा पाहण्यासाठी खूप सारे लोक आले होते. अगदी थिएटर हाऊस फुल झालं होतं. यावरून हे सिद्ध होतं की, आमिर खानचा 3 इडियट्स हा सिनेमा सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली सिनेमांपैकी एक आहे जो जगभरात पसंत केला जातो.

थिएटरच्या आयोजकांनीरही याबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “फ्यूस लाईन सिनेमाचा शेवटचा शो. वेळ 15.30 आहे. हे चांगलं होणार आहे. 131 गेस्ट्स सिनेमा पाहण्यासाठी येणार आहेत. थिएटर हाऊसफुल आहे. धन्यवाद.”

3 इडियट्स हा सिनेमा परदेशातील 415 स्क्रीन्सवर आणि देशभरातील 1800 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता. ही रिलीज त्यावेळची मोठी घरगुती रिलीज होती.

करीनासोबत दिसाल होता आमिर खान

3 इडियट्स हा सिनेमा 25 डिसेंबर 2009 साली रिलीज करण्यात आला होता. यात आमिर खान आणि करीना कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय शर्मन जोशी, आर माधवन आणि बोमन इराणी हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.