×
Homeताज्या बातम्याJayant Patil | देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' विधानावर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले- 'लोक...

Jayant Patil | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘लोक फार हुशार आहेत, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमागे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाच हात होता, असा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. दरम्यान, सर्व सरप्राईज आता संपले असून 2024 मध्ये अनेक सरप्राईज देऊ असे फडणवीस यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. फडणवीस यांनी केलेल्या विधानानंतर आगामी काळात राज्यात कोणती राजकीय (Maharashtra Politics) उलथापालथ होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उत्तर दिलं आहे. आम्हीच फडणवीस यांना 2024 मध्ये अनेक सरप्राईज देऊ असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे.

लोक फार हुशार असतात

2024 साली लोकसभेसोबतच (Lok Sabha) विधानसभेचीही निवडणूक (Legislative Assembly Election) होईल, असे मी गृहीत धरलेले आहे. हे गृहीत धरुनच आम्ही कामाला लागलो आहोत. सध्या अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. त्यातून आगामी काळातील चित्र निराशाजनक असेल. 2024 साली सकारात्मक विचार करुन महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सत्तेत आणण्याचे काम केले जाईल. लोक फार हुशार असतात. आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे 2024 साली आमचे सरकार पुन्हा सत्तेत येईल आणि हेच देवेंद्र फडणवीस यांना सरप्राईज असेल, असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

जे ठाम असतात तेच आपले असतात

जे जाणारे असतात ते कधीच कोणाचे नसतात. त्यामुळे त्यांच्या मागे लागायचे नसते.
लोक येत असतात जात असतात. जे ठाम असतात तेच आपले असतात.
कोण कच्चं कोण पक्कं आहे याबाबत आपल्याला माहिती असते.
जोपर्यंत आपल्यात नवी माणसं निवडून आणण्याची ताकद असते तोपर्यंत घाबरण्याची गरज नसते.
निवडणूक जवळ आल्याने काही लोक येतील काही लोक जातील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Web Title :- Jayant Patil | jayant patil criticizes devendra fadnavis claims will win 2024 assembly election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक! एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीपात्रात, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

Bank Of Maharashtra Recruitment 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगाभरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारिख

Must Read
Related News