Jayant Patil | जयंत पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, म्हणाले – ‘पुढील 48 तासांत…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ( Maharashtra Politics News) चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख केला आहे. यावरुन ठाकरेंवर टीका होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे. पुढील 48 तासात ठाण्यातील पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बदली करुन दाखवा, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री
(Home Minister) आणि उपमुख्यमंत्री आहेत. पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर त्यांच्या अधिकारांतर्गत येत नाही. सध्या ठाणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची (Law and Order) परिस्थिती बघितली, तर माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे. त्यांनी आज, उद्यापर्य़ंत किंवा पुढील 48 तासांत ठाणे शहरातल्या पोलीस आयुक्तांपासून (Thane Police CP) सर्व पोलीस अधिकाऱ्यांची ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात बदली (Police Transfer) करावी. असं केलं तरच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये खरंच दम आहे, असं आम्ही समजू, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दबावाखाली पोलीस (Maharashtra Police) खातं वागत नाही, यावर आम्ही विश्वास ठेऊ, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला

दरम्यान, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे.
अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय.
पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हालायला तयार नाही,
असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला.

Web Title :-   Jayant Patil | jayant patil on thane law and order give challenge to devendra fadnavis to transfer cp eknath shinde
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | ठाण्यातील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले – ‘फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे तर हे तर गुंडमंत्री’ (व्हडिओ)

Roshni Shinde | ‘गुंडगिरी करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?’, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Sinhagad Fort-Regional Tourism Scheme | प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी 3 कोटी 75 लाख मंजूर