Jayant Patil | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ विधानावर जयंत पाटील यांचा यू-टर्न; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत एक विधान केले होते. त्यावर त्यांनी ही शरद पवार (Sharad Pawar) यांची राजकीय खेळी असू शकते. असं देखील म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रतिक्रिया येत असतानाच आता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या या विधानावर घूमजाव केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी घूमजाव केल्याचे समोर आले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘पहाटेचा शपथविधी ही खेळी होती, असं मी बोललो नाही. तो एक अंदाज आहे. तो माझा कयास आहे. शरद पवार आम्हाला विचारून पावलं टाकत नाहीत. त्यांनी आम्हाला विचारून निर्णय घ्यावेत, असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्ही फार ज्युनिअर आहोत. शरद पवार यांनी एखादी गोष्ट केली तर त्याचा अर्थ कळण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे त्या काळातला घटनाक्रम बघितला तर, त्या घटनेचा फायदा नवीन सरकार स्थापन होण्यास झाला, हे नाकारून चालणार नाही. शरद पवार यांनी ते जाणूनबुजून केलं, असं मी म्हणालो नाही. पण त्या घटनेचे फायदे काय झाले? हे मी त्यांना सांगत होतो.’ असं यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.

एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या संवाद कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले होते की,
‘मला वाटत नाही की अजित पवार काही बोलले असतील. पण त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.
राष्ट्रपती राजवट उठविल्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली ही खेळी असू शकते.
त्यामुळे मला वाटत नाही की त्याला यापेक्षा काही जास्त महत्व आहे.
त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना आजही महत्व नाही.
त्यानंतर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणुन
काम केले आहे. या काळात त्यांनी स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटला नाही.
आता शिवसेनेचे (Shivsena) आमदार फुटल्याने सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे
यांना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली.’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यावर महाराष्ट्रातील राजकीय
वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या.

Web Title :- Jayant Patil | jayant patil took u turn on statement on sharad pawar and devendra fadnavis ajit pawar early oath taking

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Graduate Constituency | नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबेंना नाही तर ‘या’ उमेदवाराला?; एका नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधान…

Maharashtra Police | पोलीस दलातील ‘बँड्समन’ची पदं कधी भरणार?, DGP आणि गृह विभागाला म्हणणे सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश