Nashik Graduate Constituency | नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबेंना नाही तर ‘या’ उमेदवाराला?; एका नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधान…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाल्यापासूनन नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना (Swarajya Sanghatna) इतर राजकीय पक्षांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना भाजपचा पाठिंबा मिळणार असे बोलले जात असतानाच स्वराज्य संघटनेचे नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) उमेदवार सुरेश पवार (Suresh Pawar) यांनी भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आपल्यालाच मिळणार असा दावा केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

आत्तापर्यंत या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. डॉ. सुधीर तांबे (Dr.Sudhir Tambe) यांनी काँग्रेस पक्षाशी (Congress) बंडखोरी करत मुलाला पाठिंबा दिला. त्यानंतर काँग्रेस पक्षातून तांबे पिता-पुत्रांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर मात्र आयात उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याची नामुष्की महाविकास आघाडीवर (MVA) ओढावली. भाजपने (BJP) मात्र, कोणताही उमेदवार या मतदारसंघात न उतरवत, कुठेतरी सत्यजीत तांबे यांच्यासाठी चर्चेची दारे उघडी ठेवल्याचे चित्र दिसत असतानाच, संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराने एक पाठिंब्याबाबत एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे परत एकदा भाजपचा पाठिंबा नेमका कुणाला असणार? असा सवाल समोर येत आहे.

भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळणार असल्याचा दावा स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे. तसेच संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत बोलणी सुरू असून उद्यापर्यंत तुम्हाला नाशिक पदवीधर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी पहायला मिळतील, असे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर (Karan Gaikar) यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमध्ये उद्या काय घडामोड घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काल नाशिक येथील कृषी महोत्सवात आले असता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
(Radhakrishna Vikhe-Patil) म्हणाले होते की, कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत पक्ष विचार करत
असून लवकरच त्याबाबतचा निर्णय समोर येईल. तशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)
हे २८ जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे.
त्याचबरोबर स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) हे देखील नाशिक
दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आता भाजप नेमकं कुणाला पाठिंबा जाहीर करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :- Nashik Graduate Constituency | nashik graduate constituency election sambhajiraje swarajya candidate claims bjp support big jolt to satyajeet tambe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार, लवकरच दिल्लीतून घोषणा – चंद्रकांत पाटील

Uddhav Thackeray | ठाणे दौऱ्यावर येताच, उद्धव ठाकरे यांचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाले… (व्हिडीओ)