Jayant Patil | भाजपावर जयंत पाटलांचा घणाघात, म्हणाले – भाजप सत्तेविना राहू शकत नाही, पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसमुळे (NCP) शिवसेनेत (Shivsena) फुट पडल्याचा आरोप भाजपाकडून (BJP) सातत्याने केला जात आहे. मात्र, शिवसेना फोडण्यासाठी भाजपानेच मोठे कटकारस्थान रचल्याचा आरोप शिवसेना आणि आघाडीतील पक्ष करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुन्हा एकदा हाच आरोप भाजपावर करताना थेट म्हटले की, सत्तेविना भाजप राहू शकत नाही, म्हणून त्यांनी पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) चालवण्यासाठी चांगली साथ दिली. पवार साहेबांनीच पुढाकार घेऊन या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळे इतर काही करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचे नाव घेतले जात आहे. शिवसेना फोडण्याचे पाप भारतीय जनता पक्षाचे आहे. हिंदुत्वाची (Hindutva) मते जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपने पक्ष फोडला.

जयंत पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रभर शिवसेनेच्या (Maharashtra Shivsena) आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल. शिवसेनेची बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती, ती भाजपप्रणित होती. शिवसेना फोडण्यात भाजपचा हात असल्याचे यातून स्पष्ट होते.

अंधेरी पोटनिवडणुकीवर (Andheri East by-Election) पाटील म्हणाले, ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम, दाम, दंड, भेद वापरुन फोडणे योग्य आहे का? अंधेरी पूर्व पोट निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जन मताची छोटीशी चाचणी होणार आहे.
उमेदवार पळवायचे काम हे करत असतील तर जनता हे पाहत आहे.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही. मात्र शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना जन्म दिला आहे.
त्यामुळे शिंदेंवर शिवसेनेचा अधिकार आहे. शिवसेनेला अशा भावना व्यक्त करायला परवानगी दिली पाहिजे.

राज्यातील काही ज्वलंत प्रश्नांवर जयंत पाटील म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे.
रस्ते, वीज, पाणी, नैसर्गिक संसाधने कमी पडू लागली आहेत.
लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत सर्वांचे एकमत झाले पाहिजे, यावर निर्णय घेतला पाहिजे.
काल ढगफुटीमुळे लोकांच्या पिकाचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे सरकारने तातडीने शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे.

Web Title :- Jayant Patil | maharashtra politics ncp jayant patil criticism on bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा