Jayant Patil | ‘कायदा व सुव्यवस्था राखणं पोलीस दलाचं काम पण…’; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ आरोपांवरुन जयंत पाटलांचा गृहमंत्र्यावर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr.Amol Kolhe) यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे राज्यभरात प्रयोग होत आहेत. या प्रयोगाला प्रेक्षकांचा तुफार प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जयंतीनिमित्त पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या महानाट्याचा प्रयोग होत आहे. मात्र, काल प्रयोगादरम्यान कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांवर (Pimpri-Chinchwad Police) गंभीर आरोप केले. मोफत पास मिळावा यासाठी पोलिसांनी धमकी दिल्याचे कोल्हे यांनी सांगितले. यावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.

 

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, लोकसभेचे सदस्य व लोकप्रिय कलाकार असलेले डॉ. अमोल कोल्हे हे सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्याचे प्रयोग राज्यभर करत आहेत. राज्यभर त्यांच्या प्रयोगांना उदंड प्रतिसाद मिळत असून छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवन व कार्याविषयी जनजागृती होत आहे. मात्र पिंपरी चिंचवड पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी या महानाट्याचे मोफत पास न मिळाल्यास नाटकाचे शो बंद पाडण्याची धमकी दिली आहे. कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखणे, हे पोलीस दलाचे काम असून अशा काही निवडक लोकांच्या मुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यात त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

खासदार अमोल कोल्हे यांना शनिवारी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
यामध्ये त्यांनी मोफत तिकीटासाठी पोलिसांकडून धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आज पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचे नाव सांगणार नाही.
कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकीट मागण्याची आहे.
अगदी शेवटी 300 रुपयांचे तिकीट काढून आपल्या लेकरांना संभाजीमहाराजांचा इतिहास दाखवायला आलेल्या प्रत्येक पालकाचे मी आभार मानतो, असे कोल्हे म्हणाले होते.

Web Title :- Jayant Patil | NCP leader Jayant Patil On BJP leader and Home Minister Devendra Fadnavis Pimpri Chinchwad Police MP Dr.Amol Kolhe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Karnataka Election Result 2023 | कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘हा पराभव भाजपाच्या…’

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कर्नाटकात पराभूत होण्याचं कारण, म्हणाले – ‘कधी कधी स्थानिक ठिकाणी…’ (व्हिडिओ)