Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कर्नाटकात पराभूत होण्याचं कारण, म्हणाले – ‘कधी कधी स्थानिक ठिकाणी…’ (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकात झालेल्या निवडणुकीचा निकाल (Karnataka Election Result 2023) लागला आहे. या निवडणुकीत भाजपचा (BJP) दारुण पराभव झाला असून काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. काँग्रेसच्या विजयावर भाजप नते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अनेक निवडणुका जिंकलो, काही निवडणुका हरलो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा जास्त आहे. कारण मोदींवर लोकांचा विश्वास आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा स्ट्राईक रेटचा उच्चार केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आम्ही अनेक निवडणुका जिंकतो, काही निवडणुका आम्ही हरतो, आमचा निवडून येण्याचा रेट इतरांपेक्षा चांगला आहे. याचे कारण मोदींवर (PM Narendra Modi) लोकांचा असलेला विश्वास. कधी कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात ज्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते, असे फडणवीस यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाडांना टोला

ईव्हिएम (EVM) भाजपचे धूर्तपणे वापरण्याचे हत्यार आहे. लोकसभा, गुजरात, उत्तर प्रदेशसाठी इव्हिएमध्ये गडबड केली जाते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केले आहे. आव्हाडांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, यापेक्षाही मोठा मूर्खपणा काय असतो? कालच्या निवडणुकीत भाजपने का नाही केलं? काही लोकांना मुर्खासारखे बोलायची सवय झाली आहे. त्यांना सल्ला आहे डोकं आपटून पहा, असा टोला आव्हाडांना लगावला. आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करु, ते करण्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra-fadnavis-reaction-on-karnataka-assembly-election-result-chhatrapati-sambhaji-nagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnataka Election Result 2023 | भाजपचं पार्सल परत पाठवलं म्हणायचं का?, कर्नाटक निकालावरुन
एकनाथ खडसेंची फडणवीसांवर बोचरी टीका

MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार! ‘त्या’ आवाहनावरुन नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल

IPS Praveen Sood Appointed As CBI Director | वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या
संचालकपदी नियुक्ती; जाणून घ्या प्रवीण सूद यांच्याबद्दल थोडक्यात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – हप्ते थकल्याने भररस्त्यात गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांना तेव्हापासूनच भाजपमध्ये जायचं होतं’, शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट