Jayant Patil On Devendra Fadnavis | काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली, त्यामुळे फडणवीसांनी आता काँग्रेसला मत द्यावे : जयंत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil On Devendra Fadnavis | पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रयत्नांमुळेच करोनावरील लस उपलब्ध झाली, त्यामुळे मोदींना मत द्या, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मग याच अर्थाने काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात (Congress Govt) पोलिओची लस तयार झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मत द्यावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. ते पुण्यातील एका प्रचारसभेत बोलत होते.(Jayant Patil On Devendra Fadnavis)

जयंत पाटील म्हणाले, देशात मत मागायच्या पद्धती बदलल्या आहेत. दहा वर्षात मोदींनी काय केले, हे फडणवीसांनी सांगितले पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांना कोणतेही काम सांगता येत नाही. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातमध्ये गेले, तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडातून एक शब्द काढला नाही.

हे सगळे लोक शरण गेलेले आहेत. असे लोक राज्याचा विकास करू शकत नाहीत. महाराष्ट्र हा लढणाऱ्या लोकांचा आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या मागे आज संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस…
सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि बार्शी शहरातील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आज इतर मुद्दे बाजूला
ठेवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करण्याची महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा कारण पंतप्रधान मोदींनी करोना
काळात आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले.
पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ स्वतःची लस तयार केली नाही,
तर इतर देशांनाही पुरवली.
पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच करोनावरील लस उपलब्ध झाली आणि देशातील जनतेचे प्राण वाचले,
त्यामुळे या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मत देऊन मोदींना विजयी करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Swargate Pune Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, स्वारगेट परिसरातील घटना

PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभास्थळावरील फ्लेक्स तुफान व्हायरल, सुशिक्षित बेरोजगाराची व्यथा, ”युवकांचा आक्रोश तुम्हाला…”