PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभास्थळावरील फ्लेक्स तुफान व्हायरल, सुशिक्षित बेरोजगाराची व्यथा, ”युवकांचा आक्रोश तुम्हाला…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PM Modi Sabha In Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचारसभा आज पुण्यातील रेसकोर्स (Pune Race Course) येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. पुणे (Pune Lok Sabha), शिरूर (Shirur Lok Sabha), बारामती (Baramati Lok Sabha) आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Lok Sabha) महायुतीच्या उमेदवारांसाठी (Mahayuti Candidates) मोदींची ही सभा होत आहे. दरम्यान, या सभास्थळी एका सुशिक्षित बेरोजगार तरूणाने लावलेले बॅनर सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral On Social Media) झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेसकोर्स मैदानावर सभा होणार असून आठवड्यापासून या परिसराचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला आहे. पुणे भाजपाने येथे सभेची जोरदार तयारी केली आहे. मात्र, रेसकोर्स परिसरातील वानवडी भागात राहणाऱ्या आयुष दीपक कांबळे या तरुणाने लावलेले बॅनर खुपच चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेष म्हणजे आयुष कांबळे याने फ्लेक्सवर आपला मोबाईल नंबर देखील नमूद केला आहे.(PM Modi Sabha In Pune)

आयुष कांबळे याने फ्लेक्सवर लिहिले आहे की…

निर्यात बंदी असो महागाई असो,
बेरोजगार असो,
इथल्या प्रत्येक शेतकर्‍याचा, मायमाऊलीचा,
युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही.
जाती, धर्म, मंदिर, मशिद यावर बोलण्यापेक्षा विकासावर, बेरोजगारीवर बोला,

  • एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर

असा मजकूर या फ्लेक्सवर आहे. हे फ्लेक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, हे फ्लेक्स लावणारा तरूण आयुष दीपक कांबळे याच्याशी संपर्क साधला असता, त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी वानवडी भागात राहण्यास असून मी पदवीधर आहे. मी अनेक ठिकाणी काम मिळावे, यासाठी अर्ज केले. मात्र काही काम लागले नाही.

त्यामुळे मी टेम्पो चालविण्यास सुरुवात केली आहे. पण एवढे शिक्षण घेऊन देखील आपल्याला काम मिळत नसेल तर काय करायचे, तसेच मागील दहा वर्षात देशातील कोणत्याही वर्गासाठी काम केले नाही. केवळ उद्योगपती करताच त्यांनी काम केले. त्यामुळे फ्लेक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रोष व्यक्त केला, असे आयुषने सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक