Swargate Pune Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swargate Pune Crime | मोबाईलवर गेम खेळत असताना नाराधमाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन (Rude behavior) करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार स्वारगेट परिसरातील एका सोसायटीत 23 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.(Swargate Pune Crime)

याबाबत पीडीत 16 वर्षीय मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नवीन गोपाल सूर्यवंशी (वय-35 रा. हुबळी, धारवाड, कर्नाटक) याच्यावर आयपीसी 354अ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगी घरातील हॉलमध्ये डायनिंग टेबल समोरील खुर्चीवर बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होती. त्यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन मुलीसोबत असभ्य वर्तन केले. मुलीने तेथून पळून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन पकडले. तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

महिलेकडे शरीर संबंधाची मागणी

पुणे : दोन मुलींना व पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेकडे शरीर सुखाची मागणी (Demand For Body Pleasure) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 8 एप्रिल रोजी वाघोली येथे घडला आहे.
याबाबत अहमदनगर येथे राहणाऱ्या 32 वर्षीय विवाहित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station)
फिर्याद दिली आहे. यावरुन अतुल गरड याच्यावर आयपीसी 354, 354ए, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिलेचे वाघोली येथे दुकान आहे. आरोपीने वेळोवेळी दुकानात येऊन दोन्ही मुलींना
व पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पतीला सांगून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन महिलेसोबत अश्लील
वर्तन केले. तसेच महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी करुन विनयभंग केला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक