Jayant Patil On PM Narendra Modi | व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात – जयंत पाटील

भोसरी : पोलीसनामा ऑनलाईन – Jayant Patil On PM Narendra Modi | व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात (Ankushrao Landge Natyagruha) ते बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha) उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील (Bhosari Vidhan Sabha) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi-MVA) कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), सचिन अहिर, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, कैलास कदम, तुषार कामठे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.(Jayant Patil On PM Narendra Modi)

जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशावर 210 लाख कोटीचे कर्ज आहे. देशातील श्रीमंत कंपन्यांना सवलती देऊन बँकांना तोट्यात आणण्याचे काम सरकारनं केलं आहे. भारतीय जनतेची लूट करण्याची पूर्ण मुभा आहे. जीएसटीचा विषय एवढा गहन केलाय की, चपलेपासून डोक्याच्या केसांपर्यत सगळ्या गोष्टींवर जीएसटी आहे.
देशातल्या जनतेकडून पैसे लुटण्याचे काम देशातल सरकार करत आहे, हे जनतेला सांगा, अस आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

लोकसभेच्या निवडणूका ह्या जनतेने हातात घेतलेल्या आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष फोडण्याचे पाप हे भाजपने केलं. हे मराठी माणसाला आवडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भाजपचा पराभव करायचा आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वळचणीला असलेल्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहेत. म्हणून त्यांचाही पराभव करायचा आहे.,असेही जयंत पाटील म्हणाले.

घराघरात तुतारी पोहोचवा

डॉ. अमोल कोल्हे यांच मागचा वेळी घड्याळ हे चिन्ह होत. त्यामुळे विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याची शक्यता जास्त आहे.
घड्याळ न्याय प्रविष्ट आहे, पण मतदारांना हे लक्षात येत नाही.
म्हणून घराघरात जाऊन शरद पवारांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे सांगा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

ACB Trap On Police Inspector | लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, संतप्त जमावाची पोलीस गाडीवर दगडफेक

Amol Kolhe On Eknath Shinde | भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी ! मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी; डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट (Video)