‘भाजप – शिवसेना’ युती तुटणार, ते स्वतंत्र लढणार, राज्यातील ‘या’ बड्या नेत्याची ‘भविष्यवाणी’

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. आघाडीतील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजप शिवसेना पक्ष ज्या प्रकारे पक्षामध्ये इतर नेत्यांना प्रवेश देत आहेत. ते पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणूका दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले.

जयंत पाटील म्हणाले, दोन्ही पक्षांना सत्तेत येण्याची खात्री नसल्याने ते इतर पक्षातील लोकांना सोबत घेत आहेत. पक्षांतर करणारे आणि करून घेणारे यांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत जनताच यांना योग्य धडा शिकवेल. सत्ता परिवर्तन अटळ आहे. असा दावा पाटील यांनी केला.

सरकार विरोधी जे पक्ष आहेत. त्यांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. पुढील १० दिवसांत घटक पक्षांशी बोलणी करून जागा वाटपाचा निर्णय घेण्यात येईल. १५ ऑगस्ट पूर्वी जागावाटप पूर्ण केले जाणार आहे. दर मंगळवारी आणि बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागावाटपा संबंधी बैठक होत आहे. निम्म्याहून अधिक जागांचा निर्णय झाला आहे. राहिलेल्या जागांचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुश्रीफ यांची गेले वर्षभर माहिती घेतली जात असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही. मुश्रीफ यांना भाजपात येण्याची दिलेली ऑफर त्यांनी नाकारली म्हणून पुढील पंधरा दिवस त्यांच्या घरावर आयकरची धाड पडली. याचा उद्देश वेगळा सांगण्याची गरज नाही.

आरोग्यविषयक वृत्त