Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव दूध संघात (Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh Maryadit, Jalgaon) पैशांचा अपहार आणि चोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्यांनी केला आहे. पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करुन घेण्याची मागणी केली आहे. तरी देखील अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे आणि ते दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, असा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

जळगाव दूध संघात अपहार नाहीतर चोरी झाली आहे. त्यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तरी देखील पोलीस अधिक्षक गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या चोरीप्रकरणी कार्यकारी संचालकांनी तक्रार करुन चोवीस तास उलटूनही आरोपींवर गुन्हा दाखल करुन घेतला जात नाही, असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

तसेच जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे (SP Pravin Munde) यांच्यावर प्रचंड दबाव आहे. गुन्हा दाखल करण्यात त्यांना भिती वाटत आहे. पोलीस स्वत:च्या कर्तव्यात कमी पडत आहेत, आपले कर्तव्य टाळत आहेत. त्यामुळे नव्याने आलेले सरकार कश्याप्रकारे कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) धाब्यावर बसवत आहेत, हे जळगाव चोरी प्रकरणातून दिसत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे गुरुवार (दि. 13) पासून जळगाव शहर पोलीस ठाण्याच्यासमोर
उपोषणाला बसले आहेत. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जयंत पाटील गेले असता, त्यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी पाटलांनी पोलीस अधिक्षक प्रवीण मुंडे यांची देखील भेट घेतली.
यावेळी त्यांनी मुंडे राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करुन घेत नसल्याचे पाटील यांनी माध्यमांना सागितले.

Web Title :- Jayant Patil | Police do not register cases under pressure, Jayant Patil alleges

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sara Ali Khan – Shubman Gill | शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल

Eknath Khadse | रश्मी शुक्ला फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळाली, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट