Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | टेस्ला (Tesla) आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क (Twitter chief Elon Musk) यांनी नव्या ट्विटमध्ये ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. एलॉन मस्क यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही एलॉन मस्क यांना उद्देशून एक ट्विट केले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. इलॉन मस्क, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरुन पाय उतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे? असं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात (Winter Session -2022) महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर (Maharashtra-Karnataka Border Issue) चर्चा सरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपण असे ट्विट केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हे ट्विट कोणत्या पक्षाने केले आहे ही माहिती मिळाली असल्याची माहिती शिंदे यांनी सभागृहात दिली होती. यावरुन जयंत पाटील यांनी एलॉन मस्क यांच्या ट्विटचा संदर्भ घेत हे ट्विट केले आहे.

काय म्हणाले होते एलॉन मस्क?

मी ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार व्हावे का? मी या ट्विटर पोलच्या निकालाल बांधील असेन.
असं एलॉन मस्क यांनी म्हटले आहे. या ट्विटरवर मस्क यांचे चाहते त्यांनी ट्विटरच्या प्रमुख पदावरून
पायउतार होऊ नये असं सांगत आहेत. दुसरीकडे मस्क यांच्या निर्णयांवर नाखूश वापरकर्ते या ट्विटर पोलला
काहीही अर्थ नसल्याचे सांगत आहेत.

Web Title :- Jayant Patil | who exactly made this tweet before stepping down give the exact result jayant patils tweet addressed to elon musk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल

Pune Crime | पुण्यात रात्रगस्तीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातील घोरपडे पेठेतील घटना

Hemant Godse | ‘एक मच्छर आदमी को…’ हेमंत गोडसेंचे संजय राऊतांना जशास तसे उत्तर