Jaydutt Kshirsagar | मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेनं केलं बेदखल

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या एका आयोजित कार्यक्रमाला गेले म्हणून शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. बीड नगरपालिकेतंर्गत शहरातील सिमेंट रस्ता आणि नाल्यांचे 70 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) उपस्थित होते.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळीक साधणे शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांना महागात पडले आहे. जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातून हाकलपट्टी केल्याची घोषणा बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील (Dhondiram Patil) यांनी केली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे काम करत असताना, जयदत्त क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो लावला नाही. मुंबईत जाऊन त्यांनी कधी उद्धव ठाकरेंची भेट घेतली नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाऊन केलेल्या उद्घाटनात कुठेही शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला नाही. ही खंत वाटल्यामुळे त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, अशी कारणे बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील (Dhondiram Patil) यांनी दिली आहेत. तसेच येणाऱ्या काळात आम्ही सर्व निवडणुका आमच्या ताकदीवर लढणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.

बीड नगरपालिकेत (Beed Municipality) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अतंर्गत बीड शहरातील
सिमेंट आणि नाल्यांच्या 70 कोटी किंमतीचे विकासकामांचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
(Jaydutt Kshirsagar), आमदार सुरेश धस (Suresh Dhas), डॉ योगेश क्षीरसागर
(Dr. Yogesh Kshirsagar), राज्याचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला जयदत्त क्षीरसागर यांनी हजेरी लावल्यामुळे कार्यकर्ते संतापले होते.
अखेर त्यांनी पक्षप्रमुखांजवळ तक्रार केल्यावर वरिष्ठांनी त्यांना पक्षातून कमी करण्याचा निर्णय घेतला.

Web Title :-  Jaydutt Kshirsagar | jaydutt kshirsagar was removed from uddhav thackerays shivsena in beed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ambadas Danve | उद्धव ठाकरेंना घाबरुन ते तिघे एकत्र येतील, पण…,  ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या भेटीवर अंबादास दानवेंचा टोला

MLA Vaibhav Naik | दिवाळीच्या उत्सवात कोकणातलं राजकीय वातावरण तापलं, वैभव नाईकांनी दिलं निलेश राणेंना ‘हे’ आव्हान