जेसीबी चालकाकडून चिमुरड्याची क्रुर चेष्टा

पुणे :पोलीसनामा आॅनलाईन

बॉल घेण्यासाठी गेलेल्या चिमुरड्याला एका जेसीबी चालकाने जेसीबी च्या सोंडी मध्ये उचलून नाल्यात टाकण्याचा प्रयत्न करून घाबरवण्याचा विडिओ काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील नागझरी परिसरातील ही घटना असून विडिओ सोशियल मीडियावर व्हायरल झाला आहे.अद्याप मात्र याप्रकरणी जेसीबी चालक आणि अन्य एका कामगारावर कारवाई होणार का?असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.सार्थक लिंबोने,असे या लहान मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागझरी परिसरातील नाल्याच्या जवळच सार्थक खेळत होता. महापालिकेच्या नालेसफाई सुरू असणाऱ्या ठिकाणी सार्थक चा बॉल गेल्याने तो तिथे बॉल घेण्यासाठी गेला,मात्र चालकाने आणि त्यांच्या एका साथीदारने त्या चिमुरड्याला जेसीबी च्या पुढच्या सोंडीत उचलून नाल्यामध्ये फेकण्याचा प्रयत्न करून घाबरवले, इतकंच नव्हे तर या सगळ्याच चित्रीकरण केले.  घाबरलेल्या अवस्थेत चिमुरड्याने कसे तरी आपला जीव वाचवत तेथून पळ काढला.या घटनेने सार्थक खूप घाबरला असल्याने त्याने घरच्यांना या बद्दल काहीच सांगितले नाही. मात्र दोन दिवसात हा विडिओ सोशल मिडिया वर व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली.जेसीबी चालक आणि चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.